नंदुरबार : बुधवारी नंदुरबारात ताशी २० किमी वेगाने वाहिल्याने शहराच्या कमाल तापमान तिन अंशाने घट झालेली दिसून आले़ ३८ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती़आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी ४१ अंशावर गेलेले तापमान तीन अंशाने घटल्याने नागरिकांना बुधवारी वाढत्या उन्हापासून काहिसा दिला़ दरम्यान, हवेत आद्रता तब्बल ७५ टक्के इतकी नोंदविण्यात आली होती़ त्यामुळे दुपारच्या वेळी काहीसा उकाडा जाणवत होता़ दरम्यान, सायंकाळी व रात्रीच्या वेळी वाऱ्यांचा प्रभाव अधिक वाढल्याने सपाटीवरील भागात धुळीची समस्या निर्माण झालेली होती़दरम्यान, ग्रामीण भागातदेखील वाºयामुळे केळी तसेच पपईच्या पिकांचे बºयापैकी नुकसान झालेले होते़ दोन दिवस ढगाळ हवामान राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे़
ताशी २० किमी वेगाच्या वाऱ्यांनी तापमानात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 20:26 IST