लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘वारी लाल परी ची गाथा नव्या युगाची’ हा नारा घेत एसटीचे चालते-फिरते अनोखे प्रदर्शन घडवणारा चित्ररथ सध्या नंदुरबारात दाखल झाला़ बसस्थानकात आलेल्या या चित्ररथातून लालपरीचा इतिहास उलगडत असल्याने शहरातील नागरिकांसह विद्यार्थी येथे भेटी देत आहेत़गुरुवारी येथे दाखल झालेल्या या चित्ररथाचे उद्घाटन धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आल़े यावेळी धुळे विभागीय लेखाधिकारी मिलिंद सांगळे, कामगार अधिकारी कमलेश भावसार, नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार, वाहतूक निरीक्षक मनोज पाटील, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, नंदुरबार तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष महादू हिरणवाळे, ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य जितेंद्रसिंह राजपूत, दिलीप चौधरी यांच्यासह नंदुरबार आगाराचे अधिकारी, कर्मचारी, वाहक चालक उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मनीषा सपकाळ म्हणाल्या की, शहरी तथा ग्रामीण भागातील प्रत्येकाची जीवन वाहिनी ठरलेल्या एसटीने बदलत्या काळानुसार पाऊल टाकले आहे. गत 70 वर्षात कोटय़ावधी प्रवाशांना प्रवास करुन आणण्याची किमया केवळ एसटीने केली आहे. दुर्देवाने राज्यात कुठेही आंदोलन अथवा मोर्चे असल्यास सर्वप्रथम एसटीवर दगड भिरकावला जातो. यामुळे मोठय़ा प्रमाणावर एसटीच्या मालमत्तेचे नुकसान होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि बस फॉरअस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालता-फिरता चित्ररथ संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आह़े चित्ररथात 1948 पासून आजवरचा इतिहास मांडला गेला आहे. सचित्र अशा या प्रदर्शनात रस्ते आणि बसस्थानकांची माहिती देण्यात आली आह़े येथे भेट देणा:या प्रवाशांना एसटीच्या इतिहासाची माहिती फाऊंडेशनचे प्रतिनिधी रोहित धोंडे, सुशांत अवसरे, संयम धारव, रवी मळगे, सुमेध देशभ्रतार हे माहिती देत आहेत़ याप्रसंगी शालेय विद्यार्थिनी आणि प्रवासी नागरिकांनी चित्र प्रदर्शना पाहण्यासाठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित सूर्यवंशी यांनी केले.
लालपरीचा इतिहास सांगणा:या प्रदर्शनाला प्रवाशांनी केली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:28 IST