शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

टॉवरची होळी टाळण्यासाठी दूरसंचारची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बीएसएनएल टॉवरच्या माध्यमातून योग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार करीत सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बीएसएनएल टॉवरच्या माध्यमातून योग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार करीत सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. दरम्यान सेवा सुरळीत न झाल्यास चारही टॉवरची होळी करण्याचा इशाराही देत  ग्राहकांनी दूरसंचारची झोप उडवली. मालमत्तेचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी दूरसंचार धुळे विभाग महाप्रबंधकांनी पत्राद्वारे सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.दुर्गम भागात ऑनलाईन कामे करण्यासाठी केवळ बीएसएनएल नेटवर्कचाच आधार घ्यावा लागत आहे. परंतु वारंवार खंडीत होणा:या सेवेमुळे नागरिकांची कुठलीही ऑनलाईन कामे पूर्ण होत नाही.           अशा सेवेमुळे नागरिकांमध्ये तब्बल तीन वर्षापासून नागरिकांना समस्यांशी तोंड द्यावे लागत आहे. शिवाय भ्रमध्वनी देखील निकामी ठरत आहे. त्या भागातील बहुतांश भ्रमणध्वनीधारक विविध मुदतीचे महागडे रिचार्ज करीत आहे. रिचार्जचा नियोजित कालावधी संपेर्पयत            सेवा सुरळीत होत नाही, यामुळे महागडय़ा रिचार्जची रक्कम वाया जात आहे. खरे तर ही रक्कम सेवेविना दूरसंचार विभागाला मिळणारे उत्पन्न असून ते अतिरिक्त ठरत आहे. अशा या खंडीत सेवा सुरळीत करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु संबंधितांकडून त्याची दखलच घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी काही दिवसांपूर्वी मोलगी परिसरातील मोलगी, सरी, वेली व जमाना या चारही बीएसएनएलच्या टॉवरला आग लावत त्यांची होळी करण्याचा इशारा दिला. यामुळे दूरसंचार विभागाची यंत्रणा खळबळून जागी झाली             आहे.चारा व लाकडे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे निवेदन देतांनाच ग्राहकांनी जाहिर केले होते. टॉवर जाळण्याचा इशारा दिल्यानंतर  निवेदन देणा:या ग्राहकांच्या सर्व प्रतिनिधींना मोलगी पोलीसांमार्फत नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. त्यात असे गैरकृत्य करता येणार नाही, केल्यास गंभीर गुन्हे दाखल              करण्यात येईल, असे म्हणत विधायक मार्गाने न्याय मिळवावा, असेही नमुद करण्यात आले होते. मोलगी              पोलीस ठाण्यामार्फत दिलेल्या नोटीसीनेही इशारा देणा:या            ग्राहकांवर फारसा परिणाम दिसून आला नाही. उलट त्यांच्या या होळी करण्याच्या आंदोलनाला राष्ट्रीय अनुसूचित दक्षता परिषद व भिलीस्थान टायगर सेना यांनी            समर्थन देत या आंदोलनात आम्हीही उतरणार असल्याचा सांगण्यात आले होते. एक राजकीय पक्ष व एका संघटनेने दिलेल्या पाठींब्यामुळे मोलगी भागातील ग्राहक आंदोलन करण्यासाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहे. या आंदोलनामुळे दुरसंचार विभागाला कदाचित आपल्या मालकीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होईल याची जाणीव झाली असावी. मालमत्तेचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी दुरसंचार विभागाच्या धुळे विभागीय कार्यालयाच्या महाप्रबंधकांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे पत्राद्वारे सुरक्षा यंत्रणा पुरविण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे पुन्हा बीएसएनएल यंत्रणा व ग्राहकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत ग्राहक नेमकी कुठली भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.