शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

विद्याथ्र्यासाठी एक महिन्याचे वेतन खर्च करणारी शिक्षिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्यार्थी आणि शाळा यांच्यासाठी वर्षातील एका महिन्याचे वेतन देत ग्रामीण शिक्षणाला वेग देण्याचा प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्यार्थी आणि शाळा यांच्यासाठी वर्षातील एका महिन्याचे वेतन देत ग्रामीण शिक्षणाला वेग देण्याचा प्रयत्न करणा:या शिक्षिका म्हणून स्नेहल गुगळे यांच्याकडे पाहिले जात़े त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा राज्य आदर्श शिक्षक जाहिर झाला आह़े यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यावर त्यांच्या आदर्श शैक्षणिक कार्यावर शिक्कामोर्तब होत़े         अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावच्या रहिवासी असलेल्या स्नेहल सज्रेराव गुगळे ह्या 2009 पासूल कलमाडी ता़ शहादा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणसेवक पदावर रुजू झाल्या होत्या़ आदिवासी बहुल क्षेत्रात काम करताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्याथ्र्याच्या अडचणी लक्षात घेऊन गरजेनुसार आवश्यक ते साहित्य उपलब्ध करुन देत शिक्षण प्रवाहात टिकून गुणवंत विद्यार्थी घडविल़े शाळेतील 100 च्यावर विद्याथ्र्याना आपलीच मुले मानत त्यांच्यासाठी स्वत:च्या वेतनातून बुटमोजे खरेदी करणे ्र, हिवाळ्यात स्वेटर खरेदी करुन देणे, शाळेच्या विद्याथ्र्यासोबतच दिवाळी करुन सहका:यांच्या मदतीने फराळ वाटप करणा:या गुगळे मॅडम यांनी नवीन आदर्श निर्माण केला आह़े विद्याथ्र्याना बालवयात फक्त पुस्तकात शिकलेल्या बाबींपेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची संधी देण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमानुसार स्वभावावर आधारित प्रत्यक्ष भेटी देण्याचा उपक्रम स्नेहल गुगळे यांच्या संकल्पेनेतून कलमाडी तर्फे बोरद येथील जिल्हा परिषद शाळेने 2010 पासून राबवण्यास प्रारंभ केला़ यात विद्याथ्र्याना बँकेची माहिती दे्ण्यासाठी बँकेची भेट, मेंढीपालन समजण्यासाठी धनगरी जत्थ्यास भेट, लाकूड उद्योगासाठी वखारीची भेट, कार्यानुभवांतर्गत कुंभारकामास भेट, आपत्ती व्यवस्थापन समजण्यासाठी प्रत्यक्ष अगिAशामन वाहन शाळेत आणून विद्याथ्र्याना त्याची माहिती दिली़ यातून विद्याथ्र्याच्या ज्ञानात भर पडली़ व्यावाहारीक ज्ञान मिळणा:या विद्याथ्र्यामध्ये वाचनाची गोडी लागावी म्हणून शाळेत बालवाचनालयाची निर्मिती करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता़ यातून गावाचेही शैक्षणिक वातावरण बदलल़े प्रत्येक बाबतीत विद्याथ्र्यामध्ये नेटकेपणा यावा यासाठी वेळप्रसंगी विद्याथ्र्याची अंघोळ घालणे, केस कापून देणे, नखे कापणे आदी कामेही त्यांनी सहज केली़ विद्याथ्र्यामध्ये गुणवत्तावाढ व्हावी यासाठी शळेत भरपूर शैक्षणिक साहित्याची निर्मिती, अत्याधुनिक डिजीटल क्लासरुम तयार करुन लोकसहभागातून टॅबलेट उपलब्ध करुन दिल़े आधुनिक शिक्षणाच्या या प्रयत्नामुळे तीन विद्यार्थी राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत झळकल़े शिक्षकांच्या मदतीने सहा लाखापेक्षा अधिक लोकसहभाग मिळवून शाळेत भौतिक बदल व विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केल्याने 4 वर्षापूर्वी शाळेला आयएसओ मानंकन प्राप्त झाले होत़े 

गत 10 वर्षाच्या काळात स्नेहल गुगळे यांनी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करुन त्यांना कराटे प्रशिक्षण, योगासन शिबिर तसेच बालवयातच गृहविज्ञानाचे धडे देण्याचा प्रयोग केला़ हा प्रयोग यशस्वी झाल्याचे विद्यार्थिनींच्या चेह:यावर झळकणा:या आत्मविश्वासातून प्रकट होतो़ गावातील एखाद्या महिलेला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर प्रोत्साहन म्हणून सन्मानपूर्वक त्या महिलांना पैठणी आणून भेट करणे आणि मुलीच्या स्वागताचे उपक्रम घेतात़ विद्याथ्र्यासाठी राबवलेल्या उपक्रमांबाबत त्यांनी लिहिलेले 2 शोधनिबंध राष्ट्रीय स्तरार्पयत पोहोचले असून 32 शैक्षणिक व वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत़ शासनाने त्यांच्या 10 वर्षाच्या सेवाकार्याची दखल घेत दिलेल्या सन्मानाच्या त्या सर्वाधिक कमी वयाच्या मानकरी आहेत हे विशेष़ त्यांना त्यांचे शिक्षक पती विष्णू वांढेकर यांची मोलाची साथ मिळत़े