लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिक्षक असलेल्या पतीकडे घर बांधण्यासाठी पैसे मागितल्यानंतर त्याने नकार दिला. या नकाराचा राग येऊन पत्नी आणि मुलाने त्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार कानडी, ता. शहादा येथे घडला आहे. मारहाण झालेल्या पतीने पत्नी आणि मुलाविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेहरचंद शंकर राठोड असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मेहरचंद राठोड हे घरी आल्यानंतर पत्नी रुख्मिणीबाई व मुलगा दीपक यांनी घर बांधकामासाठी पैशांची मागणी केली. यावेळी मेहरचंद राठोड यांनी पैसे नसल्याचे दोघांना सांगितले. याचा राग आल्याने पत्नी रुख्मिणीबाई व मुलगा दीपक यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान जवळ पडलेली वीटही त्यांच्या डोक्यात घातली. यात शिक्षक राठोड हे जखमी झाले. या प्रकारानंतर त्यांनी थेट म्हसावद पोलीस ठाणे गाठत पत्नी व मुलाविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल रामदास पावरा करत आहेत.
शिक्षक पतीला पत्नी व मुलाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 13:22 IST