शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

तापी-बुराई व उपसा योजनेबाबत हवेतच वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 14:12 IST

मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तापी-बुराई नदीजोड प्रकल्प आणि तापीवरील २२ उपसा सिंचन योजना मृगजळच ठरतील की ...

मनोज शेलार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापी-बुराई नदीजोड प्रकल्प आणि तापीवरील २२ उपसा सिंचन योजना मृगजळच ठरतील की काय? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील हे परवा जिल्ह्यात येऊन गेले. ते या योजनांबाबत मोठी घोषणा करतील, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना लागून होती. परंतु केवळ औपचारिकता म्हणून त्यांनी बैठक घेऊन काढता पाय घेतला. त्यामुळे तापी-बुराई योजनेचे फळ या पिढीला तरी चाखता येणार नाही यावर आता शेतकऱ्यांचेही एकमत झाले आहे. तर उपसा योजनांनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणखी किती वर्षांनी पोहचेल याचीही शाश्वती नाही.नंदुरबार जिल्ह्यतील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अपूर्ण योजना पूर्ण करणे आवश्यक आहे. निधीअभावी अनेक योजना रखडल्या आहेत. काही योजना पूर्ण झाल्या, परंतु त्यांच्यातून पाटचाऱ्या, वितरिका काढल्या गेलेल्या नाहीत त्यामुळे त्या बंधारे, धरणांचा उपयोग शेतकऱ्यांच्या दृष्टीने शून्य आहे. प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. वर्षभर पाणीसाठा राहूनही ते पाणी शेतापर्यंत पोहचू शकत नाही हे शल्य शेतकऱ्यांना बोचत आहे. राजकीय मानसिकता नसणे, पाठपुरावा करणारी ठोस यंत्रणा नसणे या बाबींमुळे जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न यापुढेही कायम राहणार यात शंका नाही.तापी-बुराई हा महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प नंदुरबार व साक्री तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे. हा प्रकल्प जेव्हा मंजूर झाला तेव्हाची व आता या प्रकल्पाची किंमत पाहता ती दुप्पट झाली आहे. या प्रकल्पात वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागणीवरून बदलदेखील झाला आहे. आता बलदाणेचा अमरावती प्रकल्प, शिवण नदीवरील विरचक प्रकल्पालाही या योजनेतून फायदा झाला पाहिजे म्हणून मागणी पुढे आली आहे. त्यामुळे प्रकल्पाला दिवसेंदिवस फाटे फुटू लागले आहेत. दुसरीकडे प्रकल्पासाठीची निधीची तरतूद दरवर्षी अगदीच तुटपुंजी राहत आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्याच्या ८ किलोमीटर पाईप लाईनचे ९० टक्के व दुसऱ्या टप्प्यातील ६ किमी पाईपलाईनचे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. जॅकवेलचे जमीन तलांकापर्यंत २० मीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सद्या हा प्रकल्प निधीअभावी ठप्प झाला आहे. निधी उपलब्धतेची अशीच गती राहिली तर पुढील ३० वर्षात देखील तो पूर्ण होणार नाही. त्यामुळे या पिढीला तरी या योजनेचे फळ चाखता येणार नाही हे जवळपास स्पष्टच आहे.दुसरीकडे तापी नदीवर प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजची कामे २००९ मध्ये पूर्ण झाल्यानंतर तेव्हापासून प्रतिवर्षी १५३.९२ द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण होतो. प्रस्तावात समाविष्ट २२ उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून ९०.५० द.ल.घ.मी. पाणीवापर होऊन १४,४१३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. योजनांच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यातील २६, शहादा तालुक्यातील १४ व नंदुरबार तालुक्यातील १९ अशा एकूण ५९ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. परंतु दुरुस्तीच्या कामांनाही सद्या खो बसला आहे. निधीच नसल्याने आणि संबंधित विभागाची मानसिकताच नसल्याने काम ठप्प आहे.जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या उपक्रमानिमित्त जिल्ह्यात आले. त्यांनी पाटबंधारे, जलसंपदा विभागाची बैठक देखील घेण्याचे नियोजन केले. दुपारी होणारी बैठक सायंकाळी सहा वाजता झाली. ती देखील अगदीच औपचारिकता म्हणून. केवळ अधिकारी, उपस्थित लोकप्रतिनिधी यांचे ऐकून घेतले. घोषणा काहीच केली नाही. किमान या दोन प्रकल्पांबाबत तरी काही तरी ठोस आश्वासन त्यांच्याकडून मिळेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांची होती. त्यासाठी राजकीय नेते, पदाधिकारी, शेतकरी संघटना यांनी त्यांना निवेदने देऊन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला. परंतु मंत्र्यांकडून काहीही ठोस मिळाले नाही. त्यामुळे तापी-बुराई योजना आणि तापीवरील २२ उपसा योजनांची दुरुस्ती या बाबी जिल्ह्यावासीयांच्या दृष्टीने केवळ आश्वासन ठरू नये.