शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन व जनतेत योग्य समन्वयाने तळोदा कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरिष्ठ महसूल प्रशासन, तालुका प्रशासन, नगरपालिका, आरोग्य व पोलीस या पाचही ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरिष्ठ महसूल प्रशासन, तालुका प्रशासन, नगरपालिका, आरोग्य व पोलीस या पाचही यंत्रणांनी आपसात सतत संवाद ठेवत अत्यंत प्रभावी नियोजन केल्यामुळे शेजारच्या नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये कोरोनाचे अनेक रूग्ण आढळून आले असतांना तळोदा तालुक्यात त्याला रोखण्यासाठी प्रशासनाला आता पावेतो यश आले आहे. असे असले तरी अजूनही त्याचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे प्रशासनाबरोबरच आमजनतेनेदेखील खबरदारी घेण्याची गरज आहे.जेव्हा कोरोना या महामारीचा शिरकाव पुणे येथे झाला. तेव्हापासूनच येथील महसूल प्रशासनाने त्याचा प्रादुर्भाव तळोद्यात रोखण्यासाठी तालुका महसूल प्रशासन, पंचायत समिती प्रशासन, आरोग्य विभाग, नगरपालिका, पोलीस प्रशासन या प्रमुख पाच यंत्रणांनी तातडीने बैठक घेऊन प्रभावी नियोजन केले. त्यानुसार त्याची कडक अंमलबजावणी करून सातत्याने कामांचा आढावा घेतला. साहजिकच यामुळे कोरोनावर नियंत्रण राखता आले. एवढेच नव्हे प्रांताधिकारी अविशांत पांडा हे स्वत: शहरात ठिकठिकाणी फेरफटका मारत परिस्थिती जाणून घेत असत. नगरपालिकेने ही फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरोना या घातक आजाराबाबत पोस्टर्स द्वारे शहरात जनजागृती केली होती. तेव्हापासूनच शहराची नियमित साफ सफाई, गटारींची स्वच्छता, तब्बल पाच ते सहा वेळा संपूर्ण शहराचे निर्जंतुकीकरण केले. याशिवाय गर्दी थोपविण्यासाठी भाजीपाला, फळ विक्रेते यांचे विभाजन करण्यात आले आहे.आरोग्य विभागानेदेखील सुरूवातीपासूनच खबरदारी घेत आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच आशा स्वयंसेविका, अंगणवाड्या स्वयंसेविका यांना कोरोनाची लक्षणे व संशयीत रूग्ण हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर शहर व ग्रामीण भागात अशा रूग्णांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे गुजरात वा इतर ठिकाणाहून आलेल्या मजुरांचेदेखील आरोग्य तपासणी करून त्यांना घरीच राहण्याबाबत आशा कार्यकर्ती व सरपंचाचे निगराणीत ठेवण्यात आले. त्याच्या आधी कोरोनाग्रस्त भागातून आलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांना थेट विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत होते. तसेच संशयीत रूग्णांना चांगला सकस आहार व प्रभावी उपचार देण्यात आल्यामुळे आतापर्यंत मात करणे शक्य झाले आहे.या महामारीला रोखण्यासाठी पोलिसांचेदेखील मोठे योगदान आहे. कारण त्यांनी शासनाच्या लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रभावीपणे केली. त्यासाठी त्यांना कठोर भूमिकादेखील घ्यावी लागली. पोलीस बंदोबस्ताचे प्रभावी नियोजन करत नाका बंदी केली. बाहेरून येणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात तातडीने दालख करत असत. विशेषत: बाहेरून कोणी येणार नाही याकडे लक्ष घालत असत. गुजरातमधून येणाºया मजुरांना थेट तपासणीसाठी विलगीकरण कक्षात दाखल करत असते. त्यानंतर तालुका प्रशासनाच्या उपस्थितीत मजुरांची आरोग्य तपासणी केली जात होती. विशेष म्हणजे अक्कलकुवा येथील कोरोना झालेल्या प्राथमिक शिक्षिकेने पोषण आहार वाटपाच्या नियोजनासाठी तळोद्याला काही काळ राहूनही पालिका, आरोग्य कर्मचारी व प्रशासनाच्या अथक परिश्रमाने कोरोनाला शिरकाव करू दिला नाही. कोरोनाच्या या लढ्यात पालिकेचे नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, विरोधी पक्षनेते संजय माळी व इतर पदाधिकारी अधिक सहकार्य करीत आहेत. एकूणच सर्वांच्याच अथक परिश्रमातून आता पावेतो कोरोनावर मात करून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यात तळोदा तालुक्याला यश आले आहे. तरीही दिवसागणिक राज्यात वाढणारी प्रचंड संख्या, स्थलांतरीत मजंूर व शहरात वाढणारी गर्दी यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरूवातीपासूनच विविध यंत्रणांशी समन्वय ठेवून संवाद साधला. त्यामुळे प्रभावी उपाययोजना राबविता आल्यात. साहजिकच सर्वांच्या सहकार्यातून आतापर्यंत कोरोनावर मात करता आली. तरीही त्याचा इतरत्र धोका वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे. - अविशांत पांडा, उपविभागीय अधिकारी, तळोदावरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना महामारीच्या लक्षणांची, त्यावरील उपायांची शहरात सातत्याने जनजागृती करीत आहे. शिवाय नियमित साफ-सफाई, निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी व गर्दी थोपविण्यासाठी भाजीपाला, फळ विक्रेत्यांची विभागणी यामुळे शक्य झाले आहे.-सपना वसावा, मुख्याधिकारी, नगर पालिका, तळोदाप्रारंभीच कोरोनाबाबत आशा, अंगणवाडी कार्यकर्ती व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रूग्णांवर तत्काळ उपचार करण्यात आले. स्थलांतरीत मजुरांचीही आरोग्य तपासणी, त्यांचा ग्रामीण भागात सर्वे करून सरपंच, आशा कार्यकर्र्तींच्या निगराणीत ठेवण्यात आले. त्याहीपूर्वी कोरोनाग्रस्त भागातून येणाऱ्यांना क्वॉरंटाईन करून उपचार केले. त्यामुळे सद्य:परिस्थिती चांगली आहे.-डॉ.महेंद्र चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, तळोदा