शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा शहर : हस्तांतराअभावी शहरातील जनतेचे वीजेचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : हस्तांतराअभावी शहरातील विजेचे 12 ट्रान्सफार्मर अक्षरश: धुळखात पडले असून, इतर ट्रान्सफार्मावरील अतिरिक्त भारामुळे ग्राहकांना खंडीत वीज पुरवठय़ाबरोबरच कमी दाबाच्या पुरवठय़ाचा सामना करावा लागत आहे. वितरणकंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेवून हे ट्रान्सफार्मर तातडीने हस्तांतर करून कार्यान्वित करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.शहरातील वाढत्या वीज ग्राहक संख्येबरोबरच ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : हस्तांतराअभावी शहरातील विजेचे 12 ट्रान्सफार्मर अक्षरश: धुळखात पडले असून, इतर ट्रान्सफार्मावरील अतिरिक्त भारामुळे ग्राहकांना खंडीत वीज पुरवठय़ाबरोबरच कमी दाबाच्या पुरवठय़ाचा सामना करावा लागत आहे. वितरणकंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेवून हे ट्रान्सफार्मर तातडीने हस्तांतर करून कार्यान्वित करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.शहरातील वाढत्या वीज ग्राहक संख्येबरोबरच अतिरिक्त वीज भारामुळे येथील वीज वितरण कंपनीने आय पी.डी.एस. योजनेंतर्गत शहरासाठी 26 नवीन ट्रान्सफार्मरचा प्रस्ताव सन 2015-2016 ला पाठविला होता. साधारण दीड ते दोन कोटीचा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावास शासनाने यंदा मंजुरी देवून 26 नवे ट्रान्सफार्मर मंजूर करून तसा ठेकादेखील ठेकेदारास देण्यात आला आहे. हे नवीन ट्रान्सफार्मर वीज वितरण कंपनीने मराठा चौक, कॉलेज चौफुली, मिरा कॉलनी, श्रेयस कॉलनी, प्रतापनगर, हसमुखनगर, तापी माँ नगर, खान्देशी गल्ली, बढरी कॉलनी, विक्रमनगर, दामोदर नगर, बायपास रोड, विद्यानगरी, हातोडा  रोड, न्यु हायस्कूल, मोठा माळी वाडा, संगम टेकडी, काका शेठ गल्ली, हरकलाल नगर, काशिनाथ नगर, शहादा रोड, सद्भावना हॉटेल अशा 26 ठिकाणे निश्चित केले आहे. यातील प्रतापनगर श्रेयस कॉलनी, हसमुखनगर, मिरा कॉलनी, दामोदर नगर, खान्देशी गल्ली, तापी मा नगर, मराठा चौक, अशा 12 ठिकाणी ठेकेदाराने ही ट्रान्सफार्मर उभेदेखील केले आहे. तथापि वीज वितरण कंपनीकडे हस्तांतराअभावी ते अजूनही  कार्यान्वित झालेले नाही. अक्षरश: ते धुळखात पडलेले आहेत. वास्तविक ही ट्रान्सफार्मर उभे करून जवळपास एक ते दीड महिना झाला आहे. शिवाय तातडीने हस्तांतरणासाठी संबंधीत ठेकेदाराला कंपनीमार्फत सूचनादेखील दिल्याचे येथील कंपनीच्या अधिका:यांचे म्हणणे           आहे, असे असताना मनमानीमुळे हस्तांतर होत नसल्याचा आरोप आहे. इकडे ग्राहकांच्या जोडण्या वाढल्यामुळे ट्रान्सफार्मरवर वीजेचा प्रचंड भार वाढला असल्याने          सातत्याने तांत्रिक बिघाडाचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी ग्राहकांना  सतत खंडीत वीजपुरवठय़ाच्या समस्येस तोंड द्यावे लागत असल्याची व्यथा आहे. साहजिकच नागरिकांचा रोष उपस्थित अधिका:यांना पत्करावा लागत आहे. ट्रान्सफार्मरची अशी वस्तुस्थिती लक्षात घेऊन या बारा ठिकाणी ट्रान्सफार्मर सुसज्जपणे उभे करण्यात आले आहे. ते हस्तांतरणासाठी संबंधितांनी सक्त ताकीद द्यावी, अशी ग्राहकांची मागणी आहे.