शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

नंदुरबार जिल्ह्याला तलाठींच्या रिक्तपदांची ’सजा’

By admin | Updated: May 11, 2017 14:04 IST

952 खेडय़ांच्या कामकाजात अडथळे

 नंदुरबार,दि.11 - जिल्हा निर्मितीला 20 वर्षाचा कालावधी होऊनही शासकीय कार्यालय आणि ग्रामीण भागात अनेक पदे आजही निम्म्यापेक्षा रिक्त आहेत़ शासनाकडून पदांची भरती होऊनही नंदुरबार जिल्ह्यात मात्र पदांची पूर्तता होत नसल्याने शहरी आणि ग्रामीणस्तरावर नागरिकांना ‘सजा’ सहन करावी लागत आह़े  

जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा विस्तार आणि सिमावर्ती भाग यामुळे तलाठी पदांची भरती करण्याची अपेक्षा होती़ गेल्या दोन वर्षात पदभरती होऊनही तलाठींवर कामाचा बोजा कायम आह़े वसूली, दाखले वाटप आणि ऑनलाईन यात गुरफटलेल्या एकेका तलाठीवर 10 गावांची जबाबदारी आह़े त्यातही पाच वर्षात एकाही तलाठीची पदोन्नती न झाल्याने मंडळाधिका:यांच्या जागाही रिक्त आहेत़ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पदभरतीबाबत कारवाई केल्यास तलाठींवरचा बोजा कमी होऊन नागरिकांची कामे होणार आहेत़ 
डिजीटल साताबारा प्रणालीत नंदुरबार जिल्हा अव्वल आला आह़े जिल्ह्यातील सातरबारे संगणकीकृत झाल्याने शेतक:यांची एक समस्या निकाली निघाली आह़े मात्र या सातबा:यांच्या प्रिंट काढणे आणि त्यांच्यावर सही शिक्के देणा:या तलाठींकडे संगणक आणि प्रिंटर ठेवण्याची जागाच नसल्याने अडचणी येत आहेत़  
 नंदुरबार तालुक्यात 137, शहादा 150, तळोदा 67, नवापूर 114, अक्कलकुवा 66 आणि धडगाव तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात तलाठी केवळ वसुली आणि शेतसारा वसुलीसाठी येताना दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े शेती खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी मूहूर्त काढण्यापूर्वी तलाठींची तारीख घ्यावी लागत असल्याचे किस्से ग्रामीण भागात सर्वश्रृत होत आहेत़ जिल्ह्यातील तब्बल 586 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात 200 पेक्षाही कमी तलाठी नियुक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आह़े यातच ऑनलाईन आणि पेपरलेस वर्कचा गाजावाजा होत असला तरी, नोंदणी  आणि दाखल्यांसाठी तलाठींकडेच नागरिकांना जावे लागत आह़े 
नंदुरबार तालुक्यात 154, शहादा 185, तळोदा 94, नवापूर 163, अक्कलकुवा 193 आणि धडगाव तालुक्यातील 163 अशा एकूण 952 गावांसाठी सध्या जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागात 209 तलाठींची नियुक्ती करण्यात आली आह़े या तलाठींकडून आठवडय़ातील चार दिवस ग्रामीण भागात आणि तीन दिवस त्या-त्या तालुका मुख्यालयात कामकाज करण्यात येत आह़े ‘आधीच कमी त्यात काम न होण्याची हमी’ अशी स्थिती सध्या ग्रामीण भागात आह़े 
महसूल विभागात तलाठींची सरळसेवेतून 234 पदे मंजूर आहेत़ यापैकी 209 पदे भरण्यात आली असून 25 पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदांचे कामकाजही 209 तलाठींनाच करावे लागत असल्याने समस्या वाढत आहेत़