शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा तास सुरक्षेचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 17:54 IST

नंदुरबार स्थानक : ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन प्लॅटफार्म एकच्या कामांची होणार चौकशी

नंदुरबार : पश्चिम रेल्वेचे डीआरएम सुनील कुमार यांनी शनिवारी नंदुरबार रेल्वे स्थानकाला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला़ सुमारे ४० अधिकाऱ्यांच्या लवाजमासह डीआरएम सुनील कुमार सव्वा तास रेल्वे स्थानकावर थांबून होते़दरम्यान, शनिवारी पहाटे सुनील कुमार मुंबई सेेंट्रल येथून सूरतसाठी रवाना झाले होते़ सुरत येथे सकाळी पोहचल्यावर त्यांनी उधना, बारडोली, व्यारा, नवापूर येथून नंदुरबार येथे हजेरी लावली़ साधारणत: अडीच वाजेच्या सुमारास ते इतर अधिकाऱ्यांच्या पथकासह नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहचले़ त्यांच्यासोबत पश्चिम रेल्वेचे मंडल वाणिज्य निरीक्षक अभय सानप, वरिष्ठ मंडल परिचालक सुहानी मिश्रा व इतर सुमारे ४० अधिकाऱ्यांचा ताफा होता़सध्या देशात लोकसभा निवडणुकींचे वारे वाहत असल्याने तसेच गुप्तचर यंत्रणांकडून विविध राज्यात व महत्वाच्या रेल्वे मार्गांवर हायअलर्ट जाहिर केले असल्याने पश्चिम रेल्वेंतर्गत येणाºया विविध रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे़विविध कामांचा घेतला आढावाडीआरएम सुनील कुमार यांनी सुमारे सव्वा तासाच्या पाहणी दौºयात नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या विविध विभागांना भेट देऊन संबंधित कामाचा आढावा घेतला़ या वेळी त्यांनी रेल्वेच्या कंट्रोल रुमलाही भेट दिली़ त्यात त्यांनी रेल्वे गाड्यांची सिग्नल व्यवस्था, प्रवासी व वाहतूक रेल्वे गाड्यांच्या वेळा, गेल्या वर्षीचे सर्व रेकॉर्ड रुम आदींची तपासणी करण्यात आली़ डीआरएम सुनील कुमार यांनी लोकोपायलट कक्षातील पॅनल रुमलाही भेट देऊन तेथील कामांचा आढावा घेतला़सुनील कुमार यांची प्रथम भेटडीआरएम सुनील कुमार यांची नंदुरबार रेल्वे स्थानकाला ही प्रथमच भेट होती़ याआधी साधारणत: वर्षभरापूर्वी तत्कालीन डीआरएम मुकूल जैन यांनी रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली होती़ दरम्यान, सुनील कुमार यांच्या दिमतीला चार डब्यांची खास रेल्वे गाडी होती़ त्यांनी नंदुरबार येथील स्थानकाला भेट झाल्यानंतर सुमारे पावने चार वाजता ते दोंडाईचा व त्यानंतर पाळधी येथे रवाना झाल्याची माहिती प्रशासनाने दिली़