शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

संशयीत ४० शिक्षकांवरही कारवाई करा अन्यथा आत्मदहन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील ७१ शिक्षकांची नियुक्ती ही बनावाट असल्याचे जिल्हा परिषदेच्या अहवालात सिद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील ७१ शिक्षकांची नियुक्ती ही बनावाट असल्याचे जिल्हा परिषदेच्या अहवालात सिद्ध झालेले असतांना केवळ ३१ शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले. उर्वरित ४० शिक्षकांना पाठीशी घातले जात असून एसआयटीच्या अहवालाच्या अधीन राहून त्यांच्या पगारही सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहे. ४० जणांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा ३१ शिक्षक जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करतील असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.सोमवारी या शिक्षकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले व धरणे आंदोलन केले. निवेदनात म्हटले आहे की, २०१७ मध्ये अपंग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत ७१ शिक्षकांचे समायोजन करून घेतले गेले होते. १९ जानेवारी २०१८ च्या ग्रामविकास उपसचिवांच्या पत्राने १५ फेब्रुवारी रोजी नंदुरबार पोलीस ठाण्यात ३१ शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले.उर्वरित ४० शिक्षकांना मोकळे सोडले ही शोकांतिका आहे. सर्वच ७१ जणांची नियुक्ती जण बनवाट होती तर ३१ जणांवरच अन्याय का?, ४० जणांना पाठीशी घालण्याचे कारण काय?.संबधीत ४० जणांच्या वेतनासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहे. २६ डिसेंबरच्या पत्रानुसार शिक्षण विभागाकडे आपण वेतनाविषयी मार्गदर्शन मागविले आहे. एसआयटी निकालाच्या अधीन राहून हे शिक्षक स्टॅम्प लिहून देण्यास तयार आहेत, तसे आम्हीही तयार आहोत.३१ शिक्षकांवर जसे गुन्हे दाखल केले तसे या ४० शिक्षकांवरही कारवाई करावी, चौकशी करून त्यांची सेवा समाप्ती करून गुन्हे दाखल करावे. १५ दिवसात याबाबत कार्यवाही झाली नाही तर गुन्हे दाखल असलेले सर्व ३१ शिक्षक जिल्हा परिषदेसमोर सामुहिक आत्मदहन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सर्व ३१ शिक्षकांच्या सह्या असून त्यांनी यावेळी काही काळ धरणे देखील धरले.