शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

उमजमाता यात्रेनिमित्त तगतराव मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : जिल्ह्यातील जागृत देवस्थांनांपैकी एक असलेल्या शिंदे, ता.नंदुरबार येथे स्वयंभू उमज माता यात्रोत्सवनिमित्त तगतराव ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : जिल्ह्यातील जागृत देवस्थांनांपैकी एक असलेल्या शिंदे, ता.नंदुरबार येथे स्वयंभू उमज माता यात्रोत्सवनिमित्त तगतराव मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक जिल्हाभरातील भाविकांच्या सहभागातून काढण्यात आली असून मंदिर ट्रस्टमार्फत काही सुवधाही करण्यात आल्या होत्या.शिंदे येथील गावकऱ्यांची भक्ती पाहून उमज माता शिंदे-खोडसगाव रस्त्यावर प्रकट झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून उमज मातेला मानले जाते. मनोकामना पूर्ण झाली तर भाविक यात्रेनिमित्त येथे नवस फेडत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांकडून गावदिवाळीचा उपक्रम राबविण्यात आला. १९ रोजी सोंगाड्यांचा तर २० रोजी तमाशा मंडळाचा कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी मंदिरावर लाकडी घोडे चढविण्यात येत आहे. ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली असेल ते भाविक लाकडी घोडे बनवून वाजतगाजत मंदिरावर येऊन चढवतात. शेजारीच अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील जलदेवता मंदिर आहे. या यात्रेत विविध वस्तू विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून मनोरंजनाची साधनेही यात्रेत दाखल झाली आहेत.भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती, ग्रामसुरक्षा दल, विठ्ठल सेवा समिती, भजनी मंडळ, आप की जय परिवार, एकलव्य मित्र मंडळ आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तर सरपंच मंगलाबाई भिल, उपसरपंच गिरधर पटेल, शैलेश पाटील, कालुसिंग भिल, दिलीप भिल, शांताबाई पाटील, उषाबाई भिल, सोनी भिल, बायाबाई भिल, ग्रामसेवक व्ही.डी. महाले हे यात्रेकरुंसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देत आहे.कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची उपेक्षा४उमजमाता यात्रेसाठी अवघ्या जिल्ह्यातून भाविक येत असतात. त्यामुळे दरवर्षी शिंदे येथे कृषी विभागामार्फत प्रदर्शन भरविण्यात येत असते. या प्रदर्शनातून यात्रेनिमित्त येणाºया शेतकºयांना कृषी विषयक उपयुक्त अशी माहिती दिली जाते. परंतु यंदा हे प्रदर्शन भरविण्यात आले नाही. चांगली माहिती मिळत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवत आले आहे. परंतु कृषी विभागामार्फत त्यासाठी उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे शेतकरी उपेक्षीत राहिले आहेत.४सुटीनिमित्त रविवारी भाविकांची गर्दी वाढणार आहे. हे लक्षात घेत शिंदे ग्रामपंचायतीमार्फत विविध सुविधा करण्यात आल्या आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम घेतले जात असल्यामुळे रात्रीही भाविकांची गर्दी दिसून येत आहे.