शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

रायखेड व नंदुरबारात दोन गावठी कट्टय़ासह तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:25 IST

म्हसावद व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा, तिघांना अटक

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : म्हसावद पोलिसांनी केलेल्या कारवाईत रायखेड येथे दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नंदुरबारातदेखील   एलसीबीने कारवाई करीत एकतानगरातून दोन तलवारी जप्त केल्या. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सिमेवर अनेक वेळा तस्करीने येणारे गावठी कट्टे जप्त करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या रॅकेटला समुळ            नष्ट करण्यात अद्यापही मध्यप्रदेश किंवा महाराष्ट्र पोलिसांना यश आले नाही. सोमवारी झालेली कारवाई देखील त्याचेच प्रतिक आहे.           शनिवार, 12 मे रोजी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात दोन जण गावठी रिव्हाल्वर विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील             यांना मिळाली.  त्यानुसार त्यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राकेश चौधरी यांना कारवाईच्या सुचना देवून मार्गदर्शन केले. म्हसावद पोलीस पथकाने  खेडदिगर बस स्थानक परिसरात सापळा रचुन आरोपींना जेरबंद केले. त्यात रिपु राजू मोरे (वय 25) रा. शिवनगर टेकडी, पानसेमल जि. बडवानी,  राजेश भगवान गोले (वय 22) रा.बडपुरा मोहल्ला, पानसेमल जि.बडवानी (मध्यप्रदेश) यांचा सममावेश आहे. दोन्ही रिव्हाल्वर दोघांनी कमरेला खोचलेले                  होते. त्यांच्याकडून जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले. म्हसावद पोलिसात रिपू मोरे व राजेश गोले यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपअधीक्षक महारू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, पोलिस उपनिरीक्षक के.टी. दाभाडे, हवालदार प्रदीप राजपूत, चंद्रकांत चव्हाण, छोटू शिरसाठ, राजेंद्र         काटके भाऊसाहेब गिरासे, घनशाम सुर्यवंशी , विश्वास साळुंखे, कांतिलाल वळवी, सिद्धार्थ सुरवाडे यांनी कारवाई केली.नंदुरबारात तलवारी जप्तनंदुरबारातील एकतानगरात देखील एलसीबीने दोन तलवारी जप्त केल्या. शहरातील एकता नगरात नगरसिंग ओंकारसिंग शिकलीकर हा नंदुरबारात तलवारी विकण्याच्या उद्देशाने तलवार बाळगून असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यांनी एकतानगरात धाड टाकली असता शिकलीकर यांच्याकडे दोन तलवारी आढळून आल्या. त्याच्याविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, सहायक निरिक्षक गणेश न्हायदे, जमादार अनिल गोसावी, हवालदार विकास पाटील, रवींद्र पाडवी, दिपक गोरे, विनोद जाधव, जगदीश पवार, प्रमोद सोनवणे, भटू धनगर, गोपाल चौधरी, किरण पावरा, संदीप लांडगे, जितेंद्र ठाकुर, राहुल भामरे, किरण मोरे, मोहन ढमढेरे, तुषार पाटील, महेंद्र सोनवणे, पंकज महाले, अमोल पवार यांनी केली.