शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

शहाद्यातील स्वॅब संकलन केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात अचानक कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढल्यानंतर शहादे शहरातच संभाव्य संशयित ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात अचानक कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढल्यानंतर शहादे शहरातच संभाव्य संशयित रूग्णांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेण्यासाठी शहादा येथील क्वॉरंटाईन सेंटर येथे स्वॅब कलेक्शन सेंटर आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आले होते. नऊ दिवसात ४१ नागरिकांचे नमुने येथे घेण्यात आले होते. मात्र तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर हे कलेक्शन सेंटर बंद करण्यात आले.परिणामी शहर व तालुक्यात बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील नागरिकांच्या घशातील स्वॅबचे नमुने आता नंदुरबार जिल्हा रूग्णालयात घेतले जात आहे. १९ एप्रिलला शहरात कोरोना विषाणू संशयित रूग्ण आढळून आल्यानंतर त्याला तपासणी व उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. २२ एप्रिलला या रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबातील व संपर्कातील नागरिकांची माहिती घेऊन त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात पाठवले. २२ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान शहरात नऊ कोरोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले.शहरात बाधित रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या कुटुंबातील व अति संपर्कातील लोकांना शोधून त्यांचे नमुने व तपासणी करण्यासाठी प्रशासनाला अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत होती. यात सर्वप्रथम ज्या परिसरात रूग्ण सापडला त्या परिसरात जाऊन त्याच्या घरी असलेल्या नागरिकांना रूग्णवाहिकेत दाखल करणे, अनेक वेळा नागरिक प्रशासनाचा ताफा पोहोचल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, नागरिकांनी गर्दी करू नये, संशयितांना ताब्यात घेताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासह परिसरात शांतता राहावी याकरिता उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर यांच्यासह आरोग्य, महसूल, पालिका व पोलीस दलातील प्रमुख अधिकाऱ्यांना त्या परिसरात हजर रहावे लागत असे कधीकधी रूग्णवाहिका येण्यास उशीर झाल्यावर दोन ते तीन तास सर्व काही कामे सोडून वाट पाहावी लागत असे. अनेक ठिकाणी रूग्ण सापडल्यानंतर त्या रूग्णाच्या संपर्कातील नागरिकांनी अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे प्रकार शहरात घडले आहे.या सर्व अडचणी दूर करण्यासाठी रूग्ण वाढीचा दर पाहता जिल्हा रूग्णालयाने शहादा येथे स्वॅब कलेक्शन सेंटर उघडण्याची परवानगी दिली. संशयित रूग्णाच्या घशातील स्वॅबचे नमुने कशा पद्धतीने घ्यावे याकरिता नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दोन एम.बी.बी.एस. डॉक्टरसह प्रयोगशाळा तंत्रज्ञ व मदतनीस अशा सहा लोकांना दोन दिवस प्रशिक्षण दिले. शहादा येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये स्वॅब कलेक्शनसाठी आवश्यक असलेले कीट व इतर वैद्यकीय साहित्यासह संपूर्ण युनिट उपलब्ध करून दिल्यानंतर ८ मे रोजी या स्वॅब कलेक्शन सेंटरचे प्रत्यक्षात कामकाज सुरू झाले. पहिल्या दिवशी १३ नागरिकांचे नमुने घेण्यात आले. यानंतर १६ मेपर्यंत येथे व्यवस्थित कामकाज सुरू होते.या कालावधीत एकूण ४१ नागरिकांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले. ज्या नागरिकांचे नमुने येथे घेतले जात होते त्यांना कलेक्शन सेंटर येथे आणल्यानंतर एक अर्ज भरून घेतल्यानंतर नमुने घेण्यात येत होते. ते आता बंद झाल्याने गैरसोय वाढली आहे.जिल्हा शल्यचिकित्सकांनी परवानगी दिल्यानंतर मोहिदा रस्त्यावरील क्वॉरंटाईन सेंटर येथे स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आले होते. प्रत्येकी एक एम.बी.बी.एस. डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व मदतनीस अशा तीन लोकांचा समावेश असलेल्या दोन टीमा तयार करण्यात आल्या होत्या. प्रत्येक टीमला सलग आठ दिवस ड्युटी व त्या पुढील आठ दिवस सुट्टी अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. स्वॅब कलेक्शन झाल्यानंतर त्यांच्या तपासणीसाठी एक स्वतंत्र रूग्णवाहिकेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा रूग्णालयात नमुने पाठविले जात होते.शहादा येथे स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू झाल्यामुळे संशयित रूग्णांचा शोध घेणे शक्य झाले होते. यामुळे प्रशासनाचा बहुमूल्य वेळ वाचत होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे हे केंद्र बंद करावे लागले. आता रूग्ण आढळून आल्यानंतर नमुने घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयात जावे लागत आहे.-डॉ.राजेंद्र पेंढारकर,तालुका वैद्यकीय अधिकारी, शहादा