तालुक्यातील जामनपाडा येथे सुनील गावित (२८) जामणपाडा हा पीडित बालिकेच्या वडिलांच्या शेतात कामाला येत असे. १ जून रोजी सात वर्षीय बालिकेचे आई-वडील शेतात गेलेले असताना ही मुलगी घरी एकटीच होती. या वेळी संशयित सुनील गावित याने या मुलीवर जबरीने शारीरिक अत्याचार केला.
पीडित मुलीला त्रास होत असल्याने त्या मुलीस नवापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडित मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता तिने ही घटना सांगितली.
याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील गावित याच्याविरुद्ध बलात्काराचा तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक करून न्यायालयात हजर केले असता १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे करीत आहेत.