शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

खोकसा धरणासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मंगळवारी नवापूर तहसील कार्यालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मंगळवारी नवापूर तहसील कार्यालयात आढावा बैठक घेऊन नुकसान भरपाई देण्यासह विविध प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी त्यांनी खोकसा प्रकल्पाची पाहणी केली.खोकसा प्रकल्पास गळती लागल्याने धरण फुटीची भीती व्यक्त होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी प्रथम खोकसा येथे भेट दिली. लघुसिंचन विभागाच्या अधिका:यांनी प्रकल्प सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र त्यांना दिले. संततधार पावसामुळे मुख्य भिंतीच्या तळाचा मातीयुक्त भाग घसरला असून त्यामुळे धरणास कुठलाही धोका नसल्याचे त्यांना अधिका:यांनी सांगितले. धरणाच्या सांडव्यातून होत असलेल्या गळतीमुळे धोका नसला तरी भविष्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी              दिले. जिल्हा नियोजन विकास मंडळातून त्यासाठीची तरतूद करण्याचा प्रय} करणार असल्याचे डॉ.भारुड यांनी सांगितले. धरण फुटीच्या अफवेमुळे आजही गावकरी टेकडय़ांवर दिवस-रात्र राहत  असल्याचे व शासकीय आश्रमशाळा वडकळंबी येथून पालक आपल्या पाल्यांना घरी घेऊन जात असल्याची बाब जि.प.चे माजी सभापती एम.एस. गावीत यांनी निदर्शनास आणून दिल्यावर सर्वानी मिळून याबाबत अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थितीबाबत सर्वसामान्य लोकांना अवगत करुन देण्यासाठी प्रय} व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आहवाकडे जाणा:या राज्य मार्गावर उकाळापाणीजवळ रस्त्याचा भराव खचून गेल्याने रस्त्याच्या मधोमध मोठे भगदाड पडल्याने आहवाकडे वाहनांची ये-जा बंद झाली होती. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड  यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांना हा मार्ग रहदारीसाठी खुला करण्यासाठी तातडीने भराव व इतर कामे करण्याच्या सूचना दिल्या.गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार व विक्रमी पाऊस पडला. त्यात तालुक्यात एकूण 30 घरांची पडझड झाली. महसूल प्रशासनाने त्याचा पंचनामा पूर्ण केला आहे. नैसर्गिक आपत्तीत कुठल्याही घटनेत बाधीत ठरलेल्या संबंधितांना येत्या आठ दिवसात त्यांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा करण्याचे आदेश डॉ.भारुड यांनी दिले. संततधार पावसात गेल्यावर्षी घरांचे  पूर्णत: नुकसान झालेल्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ देण्यात आल्याचे जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी सांगितले. त्याच धर्तीवर यंदाही नुकसानग्रस्तांना लाभ देण्याची मागणी केली असता सहायक गटविकास अधिकारी गोसावी यांना संबंधितांचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी तात्काळ पाठविण्याची सूचना त्यांनी केली.शासकीय योजना व रकमेतून यापुढे होणारे रस्ते, पूल व इतर कामे गुणवत्तापूर्वक करण्यात यावीत यासाठी कार्यकारी अभियंत्यांना कळविण्यात आले असून त्यासाठीची लेखी हमी संबंधित मक्तेदार व अभियंत्यांकडून घ्यावयाची आहे. यापुढे कामांच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड होणार नाही व कामात कसूर दिसून आल्यास संबंधित मक्तेदार व अभियंता यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दिला. तालुक्यातून जाणा:या गॅस पाईप लाईनसाठी अल्पदरात व बळजबरी जमीन संपादित होत असल्याची बाब व महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला काही शेतक:यांना मिळाला नसल्याच्या मुद्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. गतवर्षी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकरी व घरांची पडझड झालेल्या 273 लोकांना नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याबाबत आर.सी. गावीत व भरत गावीत यांनी अवगत करुन दिल्यानंतर या प्रश्नी लवकरच मार्ग काढण्यात येईल, असे डॉ.भारुड यांनी स्पष्ट केले.  प्रारंभी जि.प.च्या माजी अध्यक्षा रजनी नाईक, भरत गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, तहसीलदार सुनिता ज:हाड, पालिकेचे गटनेते गिरीश गावीत, पाणीपुरवठा सभापती  अरुणा पाटील, आरोग्य सभापती मंगला सैन यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे स्वागत केले. बैठकीला नायब तहसीलदार राजेंद्र नजन, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपनिबंधक, वीज वितरण कंपनी, इतर शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.