शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आधार द्या आणि बियाणे न्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी कृषी विभागाने बियाणे वितरणाबाबत काही अटी शिथिल केल्या असून शेतकऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी कृषी विभागाने बियाणे वितरणाबाबत काही अटी शिथिल केल्या असून शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रात केवळ आधार कार्ड दिल्यानंतर बियाणे मिळणार आहे़ यंदा दोन लाख ८९ हजार हेक्टर खरीप क्षेत्रासाठी तब्बल ३८ हजार ६६८ क्विंटल बियाण्याची गरज भासणार आहे़ या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी कृषी विभागाने हा निर्णय घेतला आहे़जिल्हा कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांंनी महाबीजसह खाजगी कंपन्यांकडे बियाणे मागणी नोंदवली आहे़ यात सर्वाधिक बियाणे हे कापूस पिकाचे असून तब्बल पावणे दोन लाख पाकिटे जिल्ह्यात उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे़ सध्या लॉकडाऊन कालावधी सुरु आहे़ लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यात नियमांना शिथिल करण्यात आले आहे़ परंतू बियाणे खरेदीसाठी दुकानांमध्ये जून व जुलै महिन्यात गर्दी होण्याचा संभव आहे़ यातून कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे़ कृषी विभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून पीओएस मशीनद्वारे खतांची विक्री करुन त्याच्या आॅनलाईन नोंदी ठेवल्या जातात़ परंतू पीओएसवर शेतकऱ्यांनी थंब दिल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे़ यामुळे पीओएसचा वापर टाळून केवळ आधार कार्ड दाखवून शेतकºयांना खत आणि बियाणे विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यानुसार कारवाईला सुरुवात करण्याचे आदेश जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक खत आणि बियाणे विक्रेत्यांना देण्यात आले आहे़ याव्यतिरिक्त जादा दरात बियाणे आणि जादा दरात खतांची विक्री झाल्यास भरारी पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे़दरम्यान जिल्ह्यासाठी खरीप हंगामात १ लाख १० हजार ८७५ मे. टन रासायनिक खतांची उपलब्धता होणार आहे. मागील शिल्लक साठा व या हंगामात आजपर्यंत प्राप्त खते मिळून २५ हजार ५२७ मेट्रीक टन एवढे रासायनिक खत आता उपलब्ध असून उर्वरीत खत मागणीप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे. युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी तसेच मिश्र खतांची आवक करण्यावर भर देण्यात आल्याने खत टंचाई टळणार असल्याचे बोलले जात आहे़जिल्ह्यात दर महिन्याच्या मंजूर आवंटनानुसार खत प्राप्त होणार असल्याने आहे़ त्यामुळे आवश्यक तेवढेच खत शेतकºयांनी खरेदी करावे. कृषी सेवा केंद्रांनी जादा दराने कृषि निविष्ठा विक्री केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील यांनी कळविले आहे.कृषी विभागाने जिल्ह्यातील परवानाधारक रासायनिक खत विक्रेत्यांनी शासनाकडून जाहीर झालेले दरपत्रक दर्शनी भागावर लावावे. कोणत्याही विक्रेत्यांनी लिंकिंग करु नये अथवा जादा दराने निविष्ठ विक्री करु नये. जादा दराने विक्री केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना वेळोवेळी करण्यात येत आहे़यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ८९ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी होणे प्रस्तावित आहे़ यात ३१ हजार ५०० हेक्टर ज्वारी, बाजरी ६ हजार ६३७, भात २५ हजार, मका ३३ हजार ५००, तूर १५ हजार ५००, मूग ८ हजार ५००, उडीद ११ हजार ५००, भूईमूग ३ हजार २५०, सूर्यफूल १५०, तीळ ७००, सोयाबीन ३० हजार हेक्टर क्षेत्रात पेरला जाणार आहे़यंदाच्या वर्षात सर्वाधिक १ लाख २२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाचे नियोजन आहे़या संपूर्ण क्षेत्रासाठी जिल्हा कृषी विभागाने ३८ हजार ६६८ क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीज आणि खाजगी कंपन्यांकडे नोंदवली आहे़ यात महाबीजकडून २ हजार ६०५ क्विंटल बियाणे पाठवण्यात आले आहे़ उर्वरित १० हजार क्विंटल बियाण्याची आवक येत्या काळात होणार आहे़ खाजगी कंपन्यांकडून ३ हजार १९ क्विंटल बियाणे आवक करण्यात आली असून यात सर्वाधिक ७७३ क्विंटल हे कापूस बियाणे असल्याची माहिती देण्यात आली आहे़येत्या काळात कोरोनाच्या संसर्गाची भिती कायम राहणार असल्याने कृषी सेवा केंद्रांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनेटायझर आणि हँडवॉश या बाबी सक्तीच्या करण्यात आल्या आहेत़ विक्रेत्यांनी बियाणे व इतर साहित्य विक्री करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे सूचित करण्यात आले आहे़ यासंबधीची जनजागृती पत्रके दुकानांवर लावण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंग न पाळणाºयांवर कारवाई होणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे़जिल्ह्यात बीटी कापसाची सर्वाधिक पेरणी होते़ यासाठी एकूण २८ विविध कंपन्यांकडून १ लाख ७१ हजार ८५६ पाकिटांची मागणी करण्यात आली आहे़ प्रती हेक्टर २़२५ किलो बियाण्याची पेरणी करण्यात येत असल्याने त्यानुसार मागणी नोंदवण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे़ यंदा खरीप हंगामासाठी प्राप्त होणाºया बियाण्यांचे स्थिर ठेवण्यावर कृषी विभाग आणि बियाणे उत्पादक कंपन्यांनी भर दिल्याची माहिती देण्यात आली आहे़