वैजालीत साकारली सुर्यमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:28 PM2019-12-15T12:28:30+5:302019-12-15T12:28:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, शाळेत आनंददायी शिक्षणासह नावीन्यपूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी तंत्रज्ञानाचा व ...

The sun is set in the light | वैजालीत साकारली सुर्यमाला

वैजालीत साकारली सुर्यमाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, शाळेत आनंददायी शिक्षणासह नावीन्यपूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी तंत्रज्ञानाचा व स्मार्टफोनचा वापर वैजाली येथील शिक्षकांनी सुर्यमाला साकारली. यातून विद्यार्थ्यांना सौरमंडलाचा अनुभव घेतला.
जिल्हा परिषद शाळा वैजाली ता. शहादा जि.प.शाळेचे शिक्षक गोपाळ गावीत व राजू मोरे यांनी एक्सोफ्लोरर फॉर मर्ज क्युब या एप्लिकेशनच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करुन दाखविले, त्यात सौरमंडलही त्यांनी साकारले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले. विद्यार्थ्यांना ग्रहमाला अगदी जवळून पाहण्याचाा योग आला. या प्रयोगातून अवघड तथा निरस वाटणारा विषय असला तरी यातून विद्यार्थ्यांमध्ये सौर मंडलाच्या अभ्यासाबाबत आवड निर्माण झाली आहे. यासाठी गुगल प्ले स्टोरवरून एक्सप्लोरर फॉर मर्ज क्यूब हे एप डाऊनलोड केले. त्यातील मार्कर इमेज असणाऱ्या मजकुराची प्रिंट स्कॅन करून सुर्यमाला पाहायला मिळाली. ग्रहमालेतील एखाद्या ग्रहाला स्पर्श केल्यास त्या ग्रहांचा आकार मोठा होतो. त्यामुळे ग्रहाचे संपूर्ण निरीक्षण करता येत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

Web Title: The sun is set in the light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.