लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऊसतोड कामासाठी जातांना परिवारातील बाल सदस्यांना एकटे सोडण्याचे धाडस पालकांना करता येत नाही. वास्तव्याच्या ठिकाणीही एकटे ठेवता येत नसल्यामुळे बालकांना शेतात सोबतच नेले जात आहे. परंतु तेथे बालकांना अपेक्षित जागा नसल्याने त्यांनी उसाच्या खोडालाच झोपडीचे रुप दिले आहे. हे दृष्य कुटुंबाच्या उदरनिर्वाहापाठोपाठ बालकांची सुरक्षा व त्यांच्या भवितव्यालाही ऊस आधारभूत असल्याचे सिद्ध करुन जाते.दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनामार्फत अनेक योजना राबविल्या गेल्या, जात आहे व राबविल्या जाणार आहेत. परंतु योजनांची अंमलबाजवणी करतांना विकासाचा उद्देशच भरकटतो. त्यामुळे त्या भागातील नागरिक योजना मंजूर होऊनही विकासापासून दूरच राहिले आहेत. तेथील नागरिकांना रोजगारासाठी परराज्य, परजिल्ह्यात स्थलांतर करीत आहे. त्यात धडगाव तालुक्यातील बोदला येथील ऊसतोड कामगार नाशिंदे ता.नंदुरबार शिवारात दाखल झाले आहे. त्यातील काही कुटुंब त्यांच्या परिवारातील बाल सस्यांसह दाखल झाले आहे. आई-वडीलच मुळ घरातून स्थलांतरीत होत असल्याने बालकाना देखील सोबत न्यावे लागत आहे. सर्व ऊसतोड कामगार एका ठिकाणी वसाहत तयार करुन राहत आहेत. परंतु या वास्तव्याच्या ठिकाणी बालकांना एकटे सोडून कामाला जाणे देखील मागील काही घटनांमुळे धोक्याचे ठरते. त्यामुळे पालक शेतात जातांना बालकांना देखील सोबत नेत आहे. परंतु शेतात बालकांना बागळणे, व दुपारची झोप घेण्यासाठी योग्य परिस्थिती अथवा जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे काही आई - वडिलांनी बालकांना सोयीसाठी शेतातच सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ऊसतोडणीे काम सुरू असलेल्या शेतातील काही ऊस न तोडता त्यांना एकत्र करुन त्यांनाच दोन खांबांचे रुप दिले आहे. त्याला झोळी बांधून बालकासाठी आराम करण्याची व्यवस्था केली आहे. एवढेच नव्हे तर खांबरुपी ऊसावर छतही निर्माण करण्यात आले आहे. त्यातून बालकांना ऊन्हापासून बचाव करण्यासाठी सावली देखील उपलब्ध झाली आहे. तेथेच ही मुले खेळणे बागळणे पसंद करीत आहे.
स्थलांतरीत मजूरांसोबत घरातील बालकेही स्थलांतर करीत असतात. परिणामी या बालकांचे शैक्षणिक नुकसान होत असते. हे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येतात. मुळगावी हंगामी वसतिगृह स्थापन करीत त्यांना निवास व भोजनाची व्यवस्था करुन दिली जाते. शिवाय परजिल्हा व परराज्यातून येणा:या मुलांसाठीही ऊसतोडीच्या ठिकाणी सोयीनुसार उपाययोजना करण्यात येत असतात. परंतु जिल्ह्यातील काही ऊसाच्या शेतातच बालके आढळून येत आहे. त्यामुळे या बालकांसाठी शिक्षण विभागामार्फत नियोजित उपाययोजना करण्यात आल्यात का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील वर्षी ऊसतोड कामगारांच्या वास्तव्याच्या जीवीत हानीच्या काही घटना घडल्या होत्या. त्यामुळे ऊसतोड कामगार आपल्या बालकांना शेतातच सोबत नेत आहे. ही बालके प्रत्यक्ष ऊसतोडणीचे काम करीत नसले तरी ते आपल्या लहान भावंडांचा सांभाळ करीत आई-वडिलांना त्यांच्या कामात सहकार्य करीत आहे.मूळगाव सोडून काही महिन्यांसाठी दुस:या ठिकाणी स्थायिक झाले आहे. संकटांशी सामना करीत उदरनिर्वाहासाठी धावपळ सुरू आहे. असे असले तरी नाशिंदे येथे दाखल झालेल्या ऊसतोड कामगारांच्या चेह:यावर कुठलेही संकट नसल्याचा ाव दिसून आला. कामगारांशिवाय त्यांच्या सोबत आलेल्या बालकांमध्येही पालावरील दुस:या जीवनाला सुरुवात झाल्याचा आनंद दिसून येत आहे.