लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा मिशन 100 अंतर्गत ऊस लागवडीबाबत मार्गदर्शनामुळे व पजर्न्यमान 1223 एम.एम. झाले असून, पाण्याची पातळी वाढल्याने ऊस उत्पादक सभासदांना दिलासा मिळाल्यामुळे लागवड करण्याचा शेतक:यांचा कल वाढल्याचे चित्र सातपुडा कार्यक्षेत्रात दिसत आहे.सध्या कारखाना कार्यक्षेत्रात किसान हायटेक नर्सरी, कोल्हापूर येथून वाणांचे रोप मागणीनुसार उपलब्ध होत आहे. कारखान्याच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी सल्लागार रामेश्वर चांडक यांच्या मार्गदर्शनानुसार बेणे प्रक्रिया, सरीडोस टाकून सभासद ऊसाची लागवड करीत आहे. एक डोळ पद्धतीने उसाची लागवड करतांना बेण्याची बचत होते व खर्चही कमी होतो. त्यामुळे सभासदांनी एकरी 800 ते एक हजार किलो बियाणे वापरून उसाची लागवड करावी व उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीने सभासदांच्या बांधावर जावून मार्गदर्शन केले जात आहे. कारखाना कार्यक्षेत्रातही चांगल्या प्रतीचे बेणे प्लॉट उपलब्ध असून, सभासदांना गट प्रमुख त्याबद्दल माहिती देत आहेत.परिसरात सभासदांना उत्तम प्रतीचे उसाचे रोप उपलब्ध होण्याचा दृष्टीकोनातून शहादा येथील सभासद यागेश सोमजी पाटील यांनी रोपवाटीका पुरूषोत्तमनगर शिवारात सुरू केली असून, नुकतेच कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांच्या हस्ते पूजन करून उद्घाटन केले. त्याप्रसंगी पर्यावरण अधिकारी आर.एस. पाटील, ऊस विकास अधिकारी गणेश चव्हाण, कल्पेश पाटील, रामेश्वर चांडक उपस्थित होते.कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सांगितले की, सहकार महर्षी सातपुडा मिशन 100 अंतर्गत जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्याचा दृष्टीने उत्तम प्रतीचे वाणाचे रोप सभासदांच्या मागणीनुसार योगेश पाटील तयार करून देतील व कारखानाही सहकार्य करेल. तसेच कारखान्यामार्फत एकरी 30 गोणी पुष्पकमल सेंद्रीय खत उधारी तत्वावर तसेच सल्फर प्रती किलो 20 रूपये प्रमाणे रोखीने सभासदांना उपलब्ध करून देत आहे. ऊस लागवडीबाबत परिसरात चेअरमन दीपक पाटील व संचालक, कार्यकारी संचालक पाटील, कृषी सल्लागार चांडक, मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत, ऊस विकास अधिकारी चव्हाण यांच्या समवेत कृषी मेळावे घेण्यात येत असून, जास्तीत जास्त उसाची लागवड करावी, असे आवाहनही केले.
एक डोळ पद्धतीने उसाची लागवड करतांना बेण्याची बचत होते व खर्चही कमी होतो. त्यामुळे सभासदांनी एकरी 800 ते एक हजार किलो बियाणे वापरून उसाची लागवड करावी व उत्पादनात वाढ व्हावी या दृष्टीने सभासदांच्या बांधावर जावून मार्गदर्शन केले जात आहे. कारखाना कार्यक्षेत्रातही चांगल्या प्रतीचे बेणे प्लॉट उपलब्ध असून, सभासदांना गट प्रमुख त्याबद्दल माहिती देत आहेत.