शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-शिवसेना युतीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:27 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीचे पक्षीय राजकारण ‘सख्खे भाऊ-पक्के वैरी’ असे असताना विचारांनी वेगळे असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांची नंदुरबार पालिकेतील युती हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ही युती एकत्र लढली आणि यशस्वीही झाल्याने त्याची चर्चा राज्यात सर्वदूर पसरली आहे.नंदुरबार पालिका ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीचे पक्षीय राजकारण ‘सख्खे भाऊ-पक्के वैरी’ असे असताना विचारांनी वेगळे असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांची नंदुरबार पालिकेतील युती हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ही युती एकत्र लढली आणि यशस्वीही झाल्याने त्याची चर्चा राज्यात सर्वदूर पसरली आहे.नंदुरबार पालिका निवडणुकीत मागील पंचवार्षिक काळात काँग्रेससोबत असलेला ‘चौधरी गट’ काँग्रेसपासून विभक्त झाला आणि भाजपमध्ये गेला. त्यामुळे चौधरी गट आणि डॉ.विजयकुमार गावीत एकत्र आल्यामुळे भाजपची शक्ती वाढली होती. अशा स्थितीत नंदुरबार पालिका निवडणुकीत धोका होऊ नये यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राजकारणाचे नवे डावपेच खेळले. भाजपपासून नाराज असलेला शिवसेनेचा गट त्यांनी जोडला. शिवसेनेचे शहरात फारसे प्रभाव नाही याची जाणीव असतानाही त्यांनी अनेक संभाव्य धोक्यांचा विचार करून ही चतुराई केली. विशेषत: गेल्यावर्षी झालेल्या शहादा पालिकेच्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी या गटाला जोडले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांना काँग्रेससोबत घेऊन निवडणूक लढवली. त्यात एकूण 39 जागांपैकी पाच जागा शिवसेनेला दिल्या व 34 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दिले. अर्थात या युतीला शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेत्यांचा सुरुवातीला अधिकृत दुजोरा नव्हता. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा प्रमुखांवर सोडून पक्षाने अधिकृत जबाबदारी टाळली होती. परंतु युती झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचार काळात जसा या युतीला लोकांचा पाठींबा मिळाला तसा नेत्यांनीही त्याला मान्यता दिली. राज्यमंत्री दादासाहेब भुसे व संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी स्वत: शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या प्रभागात सभाही घेतली.नंदुरबार शहरात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा वैयक्तिक प्रभाव व संपर्क दांडगा आहे. संपूर्ण निवडणुकीचा प्रचार हा त्यांच्याभोवतीच केंद्रीत राहिला आणि त्याच बळावर त्यांनी यशही मिळविले. या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या 39 जागांपैकी 28 जागांवर काँग्रेस-शिवसेना युतीचा विजयी झाल्या. त्यात काँग्रेसचे 34 पैकी 24 तर शिवसेनेचे पाचपैकी चार जागा आल्या. काँग्रेसच्या यशापेक्षा शिवसेनेला ज्या चार जागा मिळाल्या त्याची चर्चा राजकारणात अधिक होत आहे. शिवसेनेचा वैयक्तिक प्रभाव की काँग्रेसच्या प्रभावाचा फायदा याबाबतही चर्चा रंगत आहे.अर्थात चर्चा काहीही असली तरी काँग्रेस आणि शिवसेना युतीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा ठरला आहे.