शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून केरळच्या वेशीवर! आज कोणत्याही क्षणी दाखल होणार; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
3
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
6
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
7
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
8
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
9
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
10
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
11
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
12
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
13
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
14
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
16
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
17
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
18
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
19
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
20
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच

सीईटी पर्सेटाईलने विद्यार्थी व पालक संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सीईटीच्या यंदाच्या पर्सेटाईल निकालामुळे पालक आणि विद्याथ्र्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गोंधळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सीईटीच्या यंदाच्या पर्सेटाईल निकालामुळे पालक आणि विद्याथ्र्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गोंधळ दूर व्हावा अशी अपेक्षा पालकांमध्ये व्यक्त होत आहे. यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे विद्याथ्र्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता यामुळे निर्माण झाल्याने पालक चिंतेत आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटीचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. यंदा ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर करतांना तो प्रथमच पर्सेटाईल पद्धतीने जाहीर केला गेला. पर्सेटाईलचा हा प्रकार अनेक विद्याथ्र्याच्या आणि पालकांच्या आकलनाबाहेर  असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वत्र गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पालक आणि विद्यार्थी ठिकठिकाणी  याबाबत विचारणा करीत असले     तरी त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकत नसल्याची स्थिती आहे. सीईटीची पीक्षा यंदा ऑनलाईन झाली. पीसीएम ग्रृपची 4, 5, 6 मे रोजी झाली. दुस:या टप्प्यात पीसीएमबी ग्रृपचे पेपर झाले होते. नेहमीप्रमाणे या परीक्षेचा निकाल लागेल अशी अपेक्षा पालक व विद्याथ्र्याना होती. परंतु पर्सेटाईल काढून निकाल जाहीर झाला. यात देखील मोठय़ा प्रमाणावर तांत्रिक गोंधळ झाल्याचा आरोप पालकांनी व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. निकालानुसार 88 गुण मिळविणा:या विद्याथ्र्याला 95 तर 124 च्या रँकमध्ये गुण मिळविणा:या विद्याथ्र्यालाही 95 पर्सेटाईल दाखविण्यात आले आहेत. यामुळे अनेक विद्याथ्र्याचे चांगल्या महाविद्यालयातील प्रवेशाचे स्वप्न अपुर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्सेटाईल काढण्याची पद्धत ही पुढील प्रमाणे असते. अ विद्याथ्र्याच्या मागे असलेले एकुण विद्यार्थी, भागिले परिक्षा देणारे एकुण विद्यार्थी     गुणीले 100 या सूत्रानुसार पर्सेटाईल काढले गेले. यामुळे एखाद्या विद्याथ्र्याला चांगले गुण मिळून देखील त्याचे पर्सेटाईल कमी दिसून येत आहे. निकालाची ही तांत्रिक त्रुटी दूर करून विद्यार्थी व पालकांची संभ्रमावस्था आणि अन्याय दूर    करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुसरीकडे 7 तारखेपासूनच सीईटीअंतर्गत    निकाल लागलेल्या विद्याथ्र्याना जिल्हानिहाय सेतू केंद्रातून प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत निर्णय व्हावा व संभ्रम दूर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.