शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

भरधाव एस.टी.बसने बालिकेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 12:14 IST

जामली फाटय़ावरील घटना : संतप्त जमावाचा रास्तारोको

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : भरधाव बसने जामली फाटय़ाजवळ आठ वर्षीय बालिकेस धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने महामार्गावर टायर पेटवून देत रास्तारोको केला. यावेळी अक्कलकुवा बसस्थानकात एका बसवर दगडफेक झाल्याने बसच्या काचा फुटल्या. शनिवारी दुपारी ही घटना घडली.महिमा संदीप वळवी (आठ वर्ष) रा.जामली, ता.अक्कलकुवा असे बालिकेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर अक्कलकुवानजीक जामली फाटय़ाजवळ भरधाव एसटी बसने (क्रमांक एमएच 14 बीटी 2233) रस्त्याच्या कडेला चालणा:या बालिकेला धडक दिली. त्यात महिमा ही बालिका जागीच ठार झाली.    याबाबत चेतना ईश्वर नाईक, कवली गव्हाण, ता.अक्कलकुवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महामार्गावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूस मोठय़ा प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस पथक घटनास्थळी पोहचल्यानंतर वातावरणातील तणाव कमी झाला. परंतु दुपारी अक्कलकुवा बसस्थानकाच्या बाहेर जमावाने बसवर (क्रमांक एमएच 20-बीएल 2663) दगड भिरकावला. त्यात बसच्या पुढील काचा फुटल्या. यावेळी जमाव अपघात करणा:या बसच्या चालकाला ताब्यात द्या अशी मागणी करीत होता. या ठिकाणी देखील लागलीच पोलीस पथक पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.याबाबत बसचालक प्रदीप तुकाराम ठाकुर यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.