शनिमांडळ येथे पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:34 PM2020-04-01T12:34:35+5:302020-04-01T12:34:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शनिमांडळ : तालुक्यातील शनिमांडळ येथील बसस्थानकालगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस ...

Stress after the collapse of a statue in Saturn | शनिमांडळ येथे पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर तणाव

शनिमांडळ येथे पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर तणाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शनिमांडळ : तालुक्यातील शनिमांडळ येथील बसस्थानकालगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर झाले होते़ घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़
शनिमांडळ गावात शनिमंदीर चौकात बसस्टँड लगत विविध व्यावसायिकांची दुकाने आहेत़ याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह मंदिर तयार करण्यात आले आहे़ सोमवारी रात्र ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने मूर्तीची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ सकाळी शनिमंदिरात दर्शनासाठी गेलेल्यांना हा प्रकार समजून आल्यानंतर त्यांनी गावात याची माहिती दिली होती़ पहाटे दोन ते तीन वाजेदरम्यान हा प्रकार झाला असावा असा अंदाज आहे़ अत्यंत गंभीर अशा या प्रकारानंतर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पाटील हे तातडीने हजर झाले होते़ त्यांच्या उपस्थितीत श्वानपथक बोलावण्यात येवून परिसरात चाचपणी करण्यात आली़ ग्रामस्थांनी येथे गर्दी करुन पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकास तातडीने अटक करण्याची मागणी केली होती़ पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी ग्रामस्थांची समजूत काढली होती़
दरम्यान विटंबना झालेल्या मूर्तीचे पोलीस अधिकाऱ्यांनी विधीवत पूजन करुन शिवालयातून काढून घेत नंदुरबारकडे रवाना केली आहे़ गावात कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी शनिमंदीर चौक परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़

दरम्यान या प्रकरणी प्रविण वसंत पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे़ मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून तातडीने या प्रकाराची चौकशी सुरु झाली होती़ पोलीस निरीक्षक ए़व्ही़पाटील घटनेचा तपास करत आहेत़

Web Title: Stress after the collapse of a statue in Saturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.