शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

स्ट्रॅाबेरीच्या गोडव्याने मिळाला ‘निधी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:46 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यात उत्तम प्रतिची स्ट्रॉबेरी उत्पादीत होत असून, या स्ट्रॉबेरीचे कौतुक खुद्द उपमुख्यमंत्री ...

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यात उत्तम प्रतिची स्ट्रॉबेरी उत्पादीत होत असून, या स्ट्रॉबेरीचे कौतुक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केले आहे. नव्हे तर स्ट्रॉबेरीची चव चाखतच नंदुरबार जिल्ह्याला विकास आराखड्यासाठी ६० कोटींचा वाढीव निधीही मंजूर केला. तसेच स्ट्रॉबेरीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना देण्याचेही आश्वासन दिले.नाशिक येथे बुधवारी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागातील नियोजन समित्यांची बैठक घेण्यात आली होती. नंदुरबार जिल्ह्यात सध्या सातपुड्यातील स्ट्रॉबेरी चांगली बहरली असून, उत्पादनही सुरू झाले आहे. सातपुड्यातील सुमारे ३० शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ही लागवड सुरू असली तरी सुरूवातीला अल्प प्रमाणात होती. यंदा मात्र लागवडीचे क्षेत्र काही प्रमाणात वाढले आहे. डाब आणि तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी या स्ट्रॉबेरीची लागवड झाली असून, उत्पादन आणि उत्पादीत मालाचा दर्जाही आता सुधारला आहे. हीच संधी साधत सातपुड्यातील स्ट्रॉबेरीला राज्यस्तरावर न्याय मिळावा यासाठी बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी नाशिक येथे उपमुख्य मंत्र्यांना सातपुड्यातील स्ट्रॉबेरीची भेट देवून त्याची माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्ट्रॉबेरीच    चव चाखून या स्ट्रॉबेरीचे कौतुक केले. त्या गोडव्यातूनच नंदुरबार जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याच्या निधीत ६० कोटी ४३ लाख रूपयांची वाढ केली. पूर्वी राज्य समितीकडे शिफारस करण्यासाठी जिल्हा नियाेजन समितीने सर्व साधारण योजनेसाठी ६९ कोटी ५७ लाखांचा आराखडा मंजुरीला दिला होता. तो आता १३० कोटी रुपयांचा करण्यात आला आहे. या आराखड्या व्यतिरिक्त स्ट्राॅबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि ताेरणमाळ पर्यटन विकासासाठी निधी देण्याचेही आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच तयार केला आहे. हा आराखडा आता मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, त्या अंतर्गत स्ट्रॉबेरी शेती विकासाच्याही योजना समाविष्ट करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नंदुरबारला येताच जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी सातपुड्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने बैठक घेवून त्यांच्याशी चर्चा केली.