शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर थांबवले पण निर्णय मात्र नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर पकल्पांतर्गत काही कुटुंबांचे मोड ता. तळोदा येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यापैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर पकल्पांतर्गत काही कुटुंबांचे मोड ता. तळोदा येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यापैकी १२ जणांना शेतीसाठी निझर (गुजरात) तालुक्यातील उभद येथे जमिनी देण्यात आल्या. परंतु याच जमिनी असल्याचे न भासवता सह्या-अंगठे घेत खराब जमिनीच्या ताबा पावत्या टपालाद्वारे देण्यात आल्या. याबाबत तोडगा काढण्यासाठी चर्चेसाठी दिवसभर प्रतिक्षा करुनही तोडगा निघाला नसल्याने त्यांच्या समस्या कायम आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बुडीताखाली येणाऱ्या सिंदुरी, गमण, अट्टी येथील प्रकल्प बाधितांचे मोड येथे २०१६ मध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यापैकी १२ बाधितांना निझर तालुक्यातील उभद शिवारातील जमिनी देण्यात आल्या. या जमिनी देतांना तळोदा ते शहादा हा महामार्ग जात असल्याचे भासवून चांगली जमिन देण्यास टाळण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षाच देखील चांगली जमिन न देता तापी नदीच्या पुरात बुडीताखाली येणारी जमिन या बाधितांच्या नावावर करण्यात आली. शिवाय बळजबरी सह्या अंगठे घेत त्या जमिनीच्या ताबा पावत्या टपालाद्वारे पाठवत फसवणूक केल्याचे बाधितांनी सांगितले. त्या जमिनीत खाण्यापुरतेही पिके घेता येत नसल्याची व्यथा मांडत त्यांनी त्या जमिनी ताब्यात घेण्यास नकार दिला.जमिनीबाबत बाधितांशी चर्चा करण्यासाठी सरदार सरोवर प्रकल्पाचे अधिकारी व गुजरातमधील अधिकारी उभद येथे येणार असल्याने बाधित सकाळीच शेतावर पोहोचले होते. दिवसभर उपाशीपोटी उन्हात थांबूनही गुजरातचे अधिकारी आले नव्हते. अधूनमधून संपर्क केला असता निघाले आहे, रस्त्यात आहे असे उत्तर मिळत होते. अखेर संबंधित अधिकारी न येता त्यांच्या खालच्या कर्मचाऱ्यांना पाठवले. बाधितांसोबत नंदुरबारचे अधिकारीही त्यांच्या प्रतिक्षेत ताटकळत थांबले होते. असे असतांनाही तोडगा निघाले नसल्याने अखेर संतप्त बाधितांनी तेथून काढता पाय घेतला. पन्हा त्यांना सकाळीच चर्चासाठी निमंत्रित करण्यात येण्याची शक्यता आहे.

सबंधित नागरिक सकाळपासूनच आले होते. शिवाय नंदुरबार जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी देखील चर्चेच्या ठिकाणी दाखल झाले होते. गुजरातचे संबंधित अधिकारी मात्र वारंवार संपर्क केल्या असता रस्त्यातच असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्ष संबधित अधिकारी न येता त्यांच्या हाताखालील कर्मचारी दाखल झाल्याने बाधितांची तीव्र नाराजी व्यक्त केली. ही चर्चा २७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने या तीन दिवसात होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले.खराब जमिनीच देणार असल्याचे भासू न देता ससप्र बाधितांच्या सह्या अंगठे घेण्यात आल्याचा आरोप चचर्चेसाठी उपस्थित झालेल्या नागरिकांनी केला असून यातून या बाधितांची मोठी फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर नेमका काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागून आहे.