महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २ व ३ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी निवेदन मोहीम तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तरावर राबविण्यात आली. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने परिषदेचे राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय, शहादा येथे निवेदन सादर करण्यात आले. राज्य शासकीय कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी यांचा भविष्य निर्वाह निधीसाठी प्रणाली सुरू करणे, विद्यार्थी पालक यांचा कल लक्षात घेता १०० टक्के कोरोनामुक्त गावात शाळा नियमित सुरू करणे, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमधून सहावी ते आठवीला शिकविणाऱ्या पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी १०० टक्के पदांना लागू करणे, सातव्या वेतन आयोगामध्ये वेतन निश्चिती होताना शिक्षक संवर्गाच्या बाबतीत निर्माण झालेल्या त्रुटींचे निराकरण करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब बावा, शहादा तालुकाध्यक्ष संजय साळी, जिल्हा उपाध्यक्ष किशोर ठाकरे, तालुका सहकार्यवाह बैसाणे, तालुका सहकार्यवाह रमेश वाडिले, प्रमोद पाटील व राजेंद्र सानप आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शहादा तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST