शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मतदान यंत्र सील करण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच मतदार संघातील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया रविवारी घेण्यात आली. येत्या दोन दिवसात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील सर्वच मतदार संघातील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया रविवारी घेण्यात आली. येत्या दोन दिवसात या मतदान यंत्रांना राजकीय प्रतिनिधींसमोर सील करण्यात येणार आहे.त्या त्या मतदारसंघात प्राथमिक तपासणी झालेली बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रे तहसील कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सुरक्षा कक्षात ठेवण्यात आली आहेत. रविवारी या यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेकरिता उमेदवार प्रतिनिधी उपस्थित होते.येत्या दोन दिवसात अर्थात 14 व 15 रोजी अशा प्रकारे सरमिसळ करण्यात आलेली यंत्रे मतदानाकरिता सेट व सिल करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासुन सदर प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक यंत्रावर प्रारूप मतदान घेतले जाणार असुन यंत्रे सुयोग्य पद्धतीने सेट करण्यात आल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच रँडम पद्धतीने पाच टक्के मतदान यंत्रांवर प्रत्येकी एक हजार मते देण्यात येणार असुन त्यांच्या सुस्थितीत असण्याची खात्री करण्यात येणार आहे.या संपुर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असुन उमेदवार वा त्यांचे प्रतिनिधी वा राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी संपुर्णवेळ उपस्थित राहु शकतात. याबाबतदेखील संबंधितांना कळविण्यात आले आहे. उमेदवार वा प्रतिनिधींना यंत्रांचे क्रमांक, मतमोजणी केंद्र याबाबतची माहितीदेखील लेखी स्वरूपात पुरविण्यात येणार आहे. सुरक्षा कक्षाला चोवीस तास अखंड सशस्त्र पोलीस बंदोबस्त असुन सेटींग सिलिंग प्रक्रिये दरम्यानही अतिरिक्त दक्षता घेण्यात येत आहे.संपुर्ण निवडणुक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने निवडणुक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन प्राप्त सुचनांचे पालन करण्यात येत असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिका:यांनी  दिली.