शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पहिली आंतरराष्ट्रीय शाळा उधार-उसनवारीने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा कारभार सध्या उधार-उसनवारीवर सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून जेवनाचे बील थकले आहे. बील न मिळाल्यास परवापासून जेवनही बंद होणार आहे. शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे विद्याथ्र्याचे हाल सुरू असून सोयी-सुविधा नसतांना, नियोजन नसतांना शाळा सुरू करण्याची घाई का? असा प्रश्न उपस्थित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा कारभार सध्या उधार-उसनवारीवर सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून जेवनाचे बील थकले आहे. बील न मिळाल्यास परवापासून जेवनही बंद होणार आहे. शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे विद्याथ्र्याचे हाल सुरू असून सोयी-सुविधा नसतांना, नियोजन नसतांना शाळा सुरू करण्याची घाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या कारणामुळे शाळाधडगाव गटातील तोरणमाळ केंद्रात 852 शाळाबाह्य मुले सव्र्हेक्षणात आढळून आली आहेत. तोरणमाळ केंद्र हे अतिदुर्गम भागात आहे. तोरणमाळ ग्रृप ग्रामपंचायतीत एकुण 29 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये एकुण 1665 मुल शिक्षण घेतात. येथील वाडे, पाडे विखुरलेले असल्यामुळे शाळेपासून अशा वस्तींचे अंतर अधीक असल्याने शाळाबाह्य मुलांची संख्या जास्त आहे. शिवाय शाळा बांधकामासाठी साहित्य नेण्यास दळणवळणाचा देखील अभाव आहे. परिणामी सर्व विद्याथ्र्याना एकाच ठिकाणी निवासी शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील ही पहिली आंतरराष्ट्रीय शाळा मंजुर करून ती सुरू करण्यात आली.बांधकाम होईर्पयत नंदुरबारातसद्य स्थितीत तोरणमाळ येथे जागा व इमारत उपलब्ध नसल्यामुळे नंदुरबार येथील शासकीय इंग्रजी आदिवासी निवासी शाळेच्या इमारतीत सोय करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी 118 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आला आहे. एकुण 1600 विद्याथ्र्याची सोय या शाळेत राहणार आहे. तोरणमाळ केंद्राअंतर्गत असलेल्या विद्याथ्र्यानाच त्या ठिकाणी सामावले जाणार आहे. त्याअंतर्गत तीन शाळा बंद करून त्या या केंद्रशाळेत समाविष्ट होणार आहेत. याशिवाय शाळाबाह्य मुलांनाही सामावून घेण्यात येणार आहे. यावर्षी शाळाबाह्य 65 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आला आहे. तोरणमाळ येथे पाच हेक्टर जागा मिळाली आहे. त्याठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. एकुण 21 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.सर्वच उधार-उसनवारीनेसध्या या शाळेत सर्वच कारभार हा उधार-उसनवारीने सुरू आहे. सध्या सुरू असलेली शाळा ही आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेची इमारत आहे. या ठिकाणी असलेले शिक्षक प्रतिनियुक्तीवरील आहेत. भोजनाचा ठेका दिलेल्या संबधितांना पाच महिन्यांपासून मोबदलाच दिला गेला नाही. नंदुरबारातील मानसी महिला बचत गट येथे आहार पुरविण्याचे काम करते. या बचत गटाचे तब्बल सहा लाख 70 हजार रुपये आहार मोबदल्याचे घेणे आहे. परंतु शिक्षणाधिकारी कार्यालय त्याकडे दुर्लक्षच करीत आहे. आता पैसे द्या नाही तर भोजन देणे बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येथील व्यवस्थापनाची धावपळ उडाली आहे.