शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
4
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
5
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
6
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
8
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
9
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
10
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
11
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
12
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
13
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
14
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
15
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
16
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
17
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
18
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
19
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
20
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

सरदार सरोवरातील पिंजरा पद्धतीने मासेमारी प्रकल्प सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील खर्डी येथे सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत पिंज:यातील मत्स्य संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादन घेण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव तालुक्यातील खर्डी येथे सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत पिंज:यातील मत्स्य संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादन घेण्याचा शुभारंभ नर्मदा सरोवर प्राधिकरणचे सल्लागार डॉ़ अफरोज अहमद यांच्याहस्ते करण्यात आल़े       यावेळी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे सहसचिव श्यामसुंदर पाटील, मुख्य वनसंरक्षक अमित कळसकर, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद नाईक, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अजिंक्य पाटील, सहाय्यक आयुक्त किरण पाडवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना डॉ़ अहमद यांनी सांगितले की, नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकास व सहकारी मच्छिमार संस्थेच्या सहकार्याने सुरु झालेली पिंजरा पद्धत मासेमारीचा उपक्रम देशासाठी पथदर्शी ठरून या भागातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. आगामी काळात हा परिसर गेम फिशिंग आणि इको टुरिझमचा भाग होईल़ नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांना वरदान ठरला आहे. महाराष्ट्राच्या वाटय़ाला 70 किलोमीटर चे बॅकवॉटर आले आहे. या पाण्याचा पिंजरा पद्धतीने मत्स्य पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ नदीच्या पाण्यात मासे जीवंत राहणे म्हणजे पाणी शुद्ध असल्याचे निदर्शक आहे.नर्मदा नदीच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाची संधी उपलब्ध झाली असून या भागात कृषी महोत्सवाप्रमाणेच मत्स्य महोत्सव आयोजित करावेत, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी बगाटे यांनी केली. डॉ. वर्तक यांनी सांगितले की,  कृषी विद्यापीठ व मत्स्य व्यवसाय विभागाचा हा पहिलाच क्षेत्रीय प्रयोग यशस्वी झाला असून तो यापुढे ही शाश्वत पद्धतीने सुरू ठेवावा. हा प्रयोग आव्हानात्मक होता. मात्र, सांघिक कार्य केल्याने तो यशस्वी झाला. त्यासाठी ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले.कार्यक्रमात माहिती देताना मस्त्य विभागाचे सहायक आयुक्त नाईक यांनी  मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून राज्यात तीन हजार पिंजरे देण्यात आले असून आगामी काळात मत्स्य विक्री साठी स्कुटी देण्यात येणार असल्याची माहिती दिली़ वनविभागाच्या अधिका:यांनी यावेळी परिसरातील विकास कामांची माहिती दिली़ कार्यक्रमात स्थानिक आदिवासी बांधवांनी उपस्थिती देत माहिती जाणून घेतली़ प्रकल्पामुळे विस्थापित होणा:या आदिवासी बांधवांना 4 हजार 200 हेक्टरचे जंगल, मूलभूत सोयी आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आदिवासी बांधवांना मत्स्य व्यवसाय सुरू करून रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे अफरोज अहमद यांनी सांगितल़े त्यामुळे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यासाठी राज्य शासनाचे महसूल, मदत व पुनवर्सन विभागाने योग्य ते सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितल़े  आगामी काळात हा मत्स्य व्यवसाय प्रकल्प देशाला मार्गदर्शक ठरुन रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल. या भागांत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली़