नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेच्या बंदोबस्तासाठी दिल्ली येथून एसपीजीचे पथक नंदुरबारात दाखल झाले आहे. याशिवाय एक हेलिकॉप्टर देखील दाखल झाले असून शनिवारी शहरासह परिसरातून तीन ते चार वेळा या हेलिकॉप्टरने घिरट्या घालून हवाई सुरक्षेचा देखील आढावा घेतला. दरम्यान, सभेच्या दिवसापुरती नंदुरबार ते दोंडाईचा या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवार, २२ रोजी नंदुरबारात सभा होत आहे. रनाळा रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्रांच्या बाजुच्या मैदानात सभेचे स्थान असून या ठिकाणी स्टेज, उपस्थित नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था आणि हेलिपॅड यांची तयारी पुर्ण झाली आहे. स्टेज आणि बसण्याची व्यवस्था संपुर्ण बंदीस्त स्वरूपाची आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी ही सोय करण्यात आली आहे. याशिवाय सभेच्या मैदानाच्या परिसरात किमान चार एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत.सभेच्या बाजुलाच अर्थात स्वामी समर्थ केंद्राच्या मागील बाजूस हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी दोन हेलिकॉप्टर उतरतील अशी व्यवस्था राहणार आहे. तेथून कारने नरेंद्र मोदी व इतर व्हीआयपी व्यासपीठाकडे येतील व परत जातील. सभेचा चारही बाजुंचा परिसर हा बंदीस्त करण्यात येणार आहे.एसपीजीचे पथक दाखलपंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था पहाणाºया दिल्लीचे एसपीजीचे पथक नंदुरबारात दाखल झाले आहे. पथकाने सभास्थळ, हेलिपॅड आणि कारने जाण्याचा मार्ग याची पहाणी करून सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन केले.हेलिकॉप्टरद्वारे टेहळणीयाशिवाय एक हेलिकॉप्टर देखील दाखल झाले आहे. त्याद्वारे शनिवारी दिवसभरात तीन ते चार वेळा शहर व परिसरात हवाई पहाणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.वाहतूक वळविलीसभेच्या दिवसापुरती वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी माहिती दिली. सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून ते सभा संपेपर्यंत या काळात दोंडाईचा व नंदुरबारकडून येणारी व जाणारी वाहने ही दोंडाईचा रस्त्याने वावद, उमर्दे फाटा, आक्राळे फाटा, उमर्दे, उड्डाणपुलाखालून नंदुरबारात येतील तर जाणारी वाहने देखील त्याच मार्गाने जातील. धुळे चौफुललीकडून केवळ सभेकडे जाणारी वाहनेच सोडण्यात येतील. सर्व प्रकारची जड वाहने ही दोंडाईचा, सारंगखेडा, शहादामार्गे वळविण्यात आली आहेत.
पंतप्रधानांच्या नंदुरबार दौऱ्यानिमित्त सुरक्षेसाठी एसपीजीचे पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 20:25 IST