नंदुरबार : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्टÑसह गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात समन्वय राहावा यावर चर्चा करण्यासाठी सिमावर्ती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची बैठक झाली. बैठकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना करणे आणि निवडणूक काळात सीमेवरील गावांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.लोकसभा निवडणुकीची अधीसुचना पुढील महिन्याच्या दुसºया किंवा तिसºया आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता स्थानिक स्तरावर आतापासूनच विविध उपाययोजना व तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचअंतर्गत महाराष्टÑ, गुजरात व मध्यप्रदेशच्या सिमेवर असलेल्या जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाºयांची बैठक सोमवार, नंदुरबारात जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, बडवाणीच्या पोलीस अधीक्षक यांग चेन डोलकर भुतीया, अपर जिल्हाधिकारी रेखा राठोर, तापी, नर्मदा या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तिन्ही राज्यातील सिमावर्ती भागातील काही गावांमध्ये जाण्यासाठी सिमा ओलांडावी लागते, काही गावातून जावे लागते. त्यामुळे अशा वेळी विनाकारण नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने बंदोबस्त ठेवावा. तपासणी देखील संशयीत वाहनांचीच करावी. गुन्हेविषयक किंवा निवडणुक विषयक माहिती किंवा संशयीत बाबी एकमेकांना लागलीच कळवाव्या असेही ठरविण्यात आले.जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सिमावर्ती भागातील अधिकाºयांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा. संशयीत व फरार गुन्हेगार यांच्यावर नजर ठेवावी. त्यांना शोधण्यासाठी एकमेकांचे सहकार्य घ्यावे. उत्पादन शुुल्क विभागानेही धडक कारवाई कराव्या अशा सुचना दिल्या.पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सिमावर्ती भागातील चेक नाक्यांवर वाढीव पोलीस बंदोबस्त राहणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ एकमेव आहे ज्याच्या सिमा तिन्ही राज्यांना जुळलेल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असली तरी समन्वयातून ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.बडवाणीच्या पोलीस अधीक्षकांनीही विविध बाबींसदर्भात सुचना मांडल्या.यावेळी नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
नंदुरबारातील सिमावर्ती भागात विशेष बंदोबस्त ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:08 IST