लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यभर सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे़ परंतु याउलट नंदुरबार जिल्ह्यातील स्थिती असून केवळ तीनच तक्रारी तालुका कृषी विभागस्तरावर मिळाल्या होत्या़ या तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून सोयाबीन पेरणी पूर्ण होत आली आहे़जिल्ह्यात यंदा २७ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाकडून निर्धारित करण्यात आले होते़ यासाठी किमान ५ हजार किलो बियाणे मागणी करण्यात आली होती़ यातील बियाण्याची आवक होत होती़ दरम्यान राज्यातील विविध भागात सोयाबीन बियाण्यांबाबत तक्रारी वाढल्याने जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची योग्य ती तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या़ यातून तालुका आणि जिल्हास्तरावरील आठ भरारी पथकांनी बियाणे तपासणी केली होती़ जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात केवळ तीनच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ या तक्रारींवर परस्पर समझोते होवून शेतकऱ्यांना बदली बियाणे देण्यात आले होते़ यानंतर मात्र जिल्ह्यात बियाणे उगवण किंवा इतर तक्रारी देण्यात आलेल्या नाहीत़ या तक्रारी प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या पथक प्रमुख एऩडी़पाडवी यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ आजअखेरीस नंदुरबार जिल्ह्यात २१ हजार ८१ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरणी पूर्ण झाली आहे़ यात नंदुरबार ६१९, नवापूर ८ हजार २८०, शहादा ६ हजार १६६, तळोदा २ हजार १६३, धडगाव ३४२ तर अक्कलकुवा तालुक्यात ३ हजार ५११ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरणी पूर्ण करण्यात आली आहे़ एकूण ७७ टक्के ही पेरणी पूर्ण झाल असून आगामी काळात पेरणीचा आकडा ९५ टक्के होण्याची शक्यता आहे़ बियाण्याबाबतच्या शंकेमुळे शेतकºयांनी यंदा सोयाबीन पेरणीला काही ब्रेक देत क्षेत्र कमी केल्याची माहिती आहे़
सोयाबीन पेरले आता रोपाची वाढ होवून उत्पादनाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:58 IST