शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटसदृष्य आवाजाने नंदुरबारसह परिसर हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरासह तालुका दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्फोटासारख्या आवाजाने हादरला. या आवाजामुळे अनेक घरांच्या भितींना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासह तालुका दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्फोटासारख्या आवाजाने हादरला. या आवाजामुळे अनेक घरांच्या भितींना तडा गेला, काचेच्या खिडक्या आणि तावदाने फुटली. इमारती आणि घरे हालल्याने एकच धावपळ उडाली. नागरिकांनी घराबाहेर येवून आवाजाचा अंदाज घेतला. दरम्यान, या आवाजामुळे सायंकाळी उशीरापर्यंत विविध अफवा पसरविल्या गेल्या. परंतु झालेला आवाज हा फायटर विमानामुळे निर्माण झालेला सॉनिक बूमचा प्रकार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.शुक्रवारी दुपारी २.५५ ते ३.०० वाजेच्या दरम्यान अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज आला. आवाजाचे क्षेत्र साधारणत: ३० ते ३५ किलोमिटर अंतरापर्यंत होते. एवढा मोठा आवाज प्रथमच नागरिकांनी ऐकल्यामुळे अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली. प्रत्येकजण एकमेकांना याबाबत विचारणा करीत होते. सोशल मिडियावर देखील विविध संदेश फिरू लागले, परिणामी अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्या.नागरिक भितीपोटी घराबाहेर...प्रचंड आवाजाने घराच्या भिंती कंपन पावल्या, खिकक्या, दरवाजे हलले, काचेच्या खिडक्यांना तडे गेले. काही जणांच्या छताचे कौले खाली पडले. यामुळे नागरिक घराबाहेर पडले. कुठे काही अघटीत तर घडले नाही याची माहिती प्रत्येकजण घेवू लागले. लहान मुलं आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण पसरले होते. शाळांमध्ये देखील विद्यार्थी दहशतीत होते.प्रशासनही अनभिज्ञ...प्रशासनाकडे देखील या आवाजानंतर साधारणत: अर्धा ते पाऊण तास काहीच माहिती नव्हती. पोलिसांनी ओझर येथील विमानतळावर याबाबत विचारणा केली. त्यानंतर या आवाजाचे गुड उकलण्यास मदत झाली. तोपर्यंत विविध अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या. काहींनी तर आधीच्या विमान अपघाताचे फोटो अपलोड करून नंदुरबारनजीक विमान कोसळल्याची अफवा पसरली. ती निस्तारतांना प्रशासन आणि पोलिसांचीही मोठी कसरत झाली.आपत्ती व्यवस्थापन कक्ष...अनेक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून विचारणा केली, परंतु या कक्षाचेच अस्तित्व नसल्याचे दिसून आले. परिणामी नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाणे, वृत्तपत्रांची कार्यालये येथे विचारणा केली. त्यानंतर नागरिकांचे समाधान झाले.आठ वर्षांपूर्वीची आठवणआठ वर्षांपूर्वी प्रशिक्षीत विमान कमी उंचीवरून नंदुरबारच्या आकाशावरून उडत गेले. ते विमान समशेरपूरनजीक कोसळल्याची अफवा पसरली. संपुर्ण प्रशासन आणि नागरिकांनी तिकडे धाव घेतली. परंतु चौकशीअंती ती अफवाच असल्याचे निष्पन्न झाले. परंतु यामुळे मात्र, आपत्ती व्यवस्थापन, प्रशासन यांचे चांगलेच हसे झाले होते. त्याच घटनेची आठवण आजच्या स्फोटसदृष्य आवाजाने झाली. ती आठवणही अनेकांनी सोशल मिडियावर शेअर केली.प्रशासनाने एटीसी व एचएएल ओझर येथे संपर्क साधला. पुणे येथून सुपर सॉनिक बूम फायटर जेट सुखोई विमान पुणे येथून नाशिक व एचएएलच्या अंडर फ्लार्इंग एरिया मध्ये सरावासाठी उड्डाण करीत होते. नंदुरबारच्या आकाशात निर्धारित उंचीपेक्षा कमी उंचीवरून उडत असल्यामुळे सुपरसोनिक बूमचा आवाज निर्माण झाला. हा आवाज प्रचंड असतो. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा आवाज ऐकण्यास मिळाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते.