नंदुरबार : मंदीरात जाणाऱ्या वृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तिच्या गळ्यातील ८० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत दोघांनी जबरीने चोरून नेल्याची घटना वळण रस्त्यावरील अंबिका माता मंदीराजवळ घडली.मदुराई येथे राहणाºया व सध्या नंदुरबारातील साई भगवती हॉटेल समोरील भागात राहणाºया सेवानिवृत्त शिक्षिका पलनीअम्माल सदानंदम (७१) या ८ रोजी साडेआठ वाजता अंबिका माता मंदीरात दर्शनासाठी जात होत्या. त्यावेळी दोन दुचाकीस्वार त्या ठिकाणी आले. वृद्धेला त्यांनी पत्ता विचारण्यात गुंतवले असता त्यातील एकाने तिच्या गळ्यातील ८० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत ओरबडून तेथून दोघांनी धूम ठोकली. वृद्धेने आरडाओरड केली, परंतु उपयोग झाला नाही. याबाबत पलनीअम्माल सदानंदनम यांनी फिर्याद दिल्याने उपनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक पगार करीत आहे.
नंदुरबारात वृद्धेच्या गळ्यातून सोनपोत लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:17 IST