शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

साडेतीनशे शाळांना मिळणार सौरउर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:04 PM

वीज जोडणीची अडचण : दुर्गम भागातील सर्वाधिक शाळा, प्रस्ताव तयार करणार

ठळक मुद्देअंगणवाडींना सर्वाधिक उपयोग होणार.. अंगणवाडय़ांना सध्या अमृत आहार योजना, कुपोषीत बालकांची काळजी, त्यांची नोंदणी, वेळोवेळी वजन घेणे, पोषण आहार योजना यासह इतर विविध योजनांसाठी काम करावे लागते. ही बाब लक्षात घेता अंगणवाडींचा सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांना सं

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील साडेतीनशे प्राथमिक शाळा व जवळपास अडीच हजार अंगणवाडय़ांना वीज जोडणी नसल्यामुळे अनेक योजना राबवितांना अडचणी येत आहेत. डिजीटल शाळा उपक्रम देखील यामुळे अडकला आहे. ही समस्या लक्षात घेवून आता वीज पुरवठा नसलेल्या शाळा आणि अंगणवाडी यांना सौर उज्रेद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.   जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यांना अनेक ठिकाणी वीज पुरवठा होऊ शकत नाही. त्याला कारण भौगोलिक परिस्थिती किंवा संबधीत शाळेर्पयत वीज पोहचलेली नाही. त्यामुळे अशा शाळा डिजीटल होण्यापासून वंचीत आहेत. शिवाय अशा शाळांमध्ये संगणकावरील काम किंवा इतर तत्सम उपक्रम राबविण्यास देखील अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी आता वीज कंपनी आणि जिल्हा प्रशासनाने अशा शाळांमध्ये सौर उज्रेद्वारा वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवडय़ात जिल्ह्यात येवून गेलेले उर्जामंत्र्यांनी याबाबत माहिती घेवून तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने वीज कंपनी आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हा परिषद शाळानंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात एकुण एक हजार 393 शाळा चालविल्या जातात. यापैकी एक हजार 53 शाळांना वीज पुरवठा जोडणी देण्यात आलेली आहे. परंतु त्यातही अनेक शाळांची वीज थकबाकी किंवा इतर कारणांनी वीज पुरवठा खंडित झालेला आहे. पुन्हा नव्याने त्यांना वीज जोडणी मिळू शकलेली नाही. अशा शाळांची संख्या देखील 100 पेक्षा अधीक आहे. त्यामुळे वीज नसलेल्या अशा एकुण जवळपास साडेचारशे शाळा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेला वीज जोडणी आवश्यक आहे. त्याआधारे संगणकावरील कामकाज, विद्याथ्र्याना संगणकाचे शिक्षण देणे, विविध प्रयोगांसाठी देखील वीज आवश्यक असते.सर्वाधिक दुर्गम भागातीलवीज जोडणी नसलेल्या सर्वाधिक शाळा या दुर्गम भागातील आहेत. अशा शाळांच्या गावाच्या ठिकाणीच वीज पोहचलेली नाही तेथे शाळेला कुठून वीज मिळेल असा प्रश्न आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक शाळा आहेत. या दोन्ही तालुक्यातील 300 तर इतर तालुक्यातील 40 शाळांचा समावेश आहे.अडीच हजार अंगणवाडय़ाजिल्ह्यात दोन हजार 434 अंगणवाडी आहेत. त्यापैकी एकाही अंगणवाडीला वीज जोडणी नसल्याचे सांगण्यात आले. केवळ 17 अंगणवाडय़ांनी वीज पुरवठय़ासाठी कोटेशन भरलेले आहे. अद्याप त्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. लवकरच या अंगणवाडींना वीज जोडणी मिळणार आहे. आता सर्वच अर्थात अडीच हजार अंगणवाडींना वीज पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. या अंगणवाडींना सौर उज्रेवर आधारीत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्यात येणार   असून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले