शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इतना सन्नाटा क्यू है भाई..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 17:10 IST

शासकीय पॉलिटेकीक : ईएनटीसी विद्याशाखेची व्यथा, विद्याशाखा बदलाचा प्रस्ताव

ठळक मुद्देसिव्हील शाखेची मागणी नंदुरबार येथील शासकीय पॉलिटेकAीक महाविद्यालयात संगणक, विद्युत, यंत्र व अणुविद्युत आदी अभियांत्रिकीच्या शाखा आहेत़ त्यापैकी अणुविद्युत म्हणजे ईएनटीसी वगळता सर्व शाखांमध्ये समाधानकारक विद्यार्थी संख्या आह़े या ठिकाणी नागरी अभियांत्रिकी नाशिक येथील तंत्रशिक्षण संचलनालयाकडे विद्याशाखा बदलाबाबत प्रस्ताव पाठविला आह़े तसेच नंदुरबार येथील शासकीय पॉलिटेकAीक महाविद्यालयात सिव्हील ब्रांचला मान्यता द्यावी अशीही मागणी प्रस्तावात करण्यात आली आह़े दुर्गम भाग तसेच रोजगाराच्या संधी कमी असल्याने विद्या

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील शासकीय  पॉलिटेकAीक महाविद्यालयात अणुविद्युत अभियांत्रिकी म्हणजेच ईएनटीसी शाखेला बोटावर मोजण्या इतकेच विद्यार्थी संख्या आह़े त्यामुळे या विद्याशाखेत ‘इतना सन्नाटा क्यू है भाई.’ अशी म्हणण्याची वेळ आली आह़े विद्यार्थी संख्या कमी असल्याने या सर्व विद्याथ्र्याची विद्याशाखा बदल करायला मान्यता मिळावी असा प्रस्ताव येथील पॉलिटेकAीकतर्फे  सहसंचालक तंत्रशिक्षण संचलनालय नाशिक यांना पाठविण्यात आला आह़े शैक्षणिक वर्ष 2017-2018 मध्ये एकूण 60 विद्यार्थी क्षमता असताना ईएनटीसी शाखेत प्रथम वर्षात केवळ चार विद्यार्थी प्रवेशित आहेत़ त्यामुळे उर्वरीत 54 जागा या रिक्त आहेत़ तसेच व्दितीय व तृतीय वर्षात अनुक्रमे सात व बारा विद्यार्थी प्रवेशित आहेत़ त्यामुळे येत्या काही वर्षामध्ये ही विद्याशाखा नंदुरबार येथून हद्दपार होते की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े संगणक, विद्युत, यंत्र या अभियांत्रिकी शाखेत ब:यापैकी विद्यार्थी संख्या असली तरी अद्यापही एकही विद्याशाखेने 60 जागांपर्यतची मजल गाठलेली नाही़ त्यामुळे येथील शासकीय पॉलिटेकAीक महाविद्यालयाला दरवर्षी विद्याथ्र्याच्या प्रवेशासाठी जुळवा-जुळव करावी लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े मंदावत जात असलेल्या टेलीकम्युनिकेशची वाढ तसेच ईएनटीसी क्षेत्रात कमी होत असलेला रोजगार यामुळे विद्याथ्र्याचा या शाखेकडे ओढा कमी असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े त्या तुलनेत संगणक अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी तसेच विद्युत अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या भरपुर संधी उपलब्ध असल्याने विद्याथ्र्याचा याच शाखांकडे विशेष पसंती असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे ईएनटीसी विद्याशाखेत विद्यार्थी मिळत नसल्याने या शाखेत विद्याथ्र्याची दरवर्षीच वाणवा असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आह़ेदरम्यान, ईएनटीसी शाखेत विद्याथ्र्याची दिवसेंदिवस घटती संख्या लक्षात घेत महाविद्यालकडून या विद्याथ्र्याच्या विद्याशाखा बदलाचा प्रस्ताव पाठविण्यात आला                  आह़े काही दिवसांपूर्वी नाशिक येथील तंत्रशिक्षण संचालनालयात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा प्रस्ताव सहसंचालक यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती आह़े विद्याथ्र्याच्या विद्याशाखा बदलाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास भविष्यात ही विद्याशाखा अस्तित्वात असेल की नाही याबाबत मात्र अनेक शंका निर्माण होत आह़े विद्याथ्र्याचे नुकसान न होता मध्यम मार्ग काढण्याची अपेक्षाविद्याथ्र्याच्या पुरेशा संख्येअभावी विद्याशाखा बदलाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असला तरी याचा विपरित परिणाम विद्याथ्र्याच्या शैक्षणिक जीवनावर होऊ नये अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात आली आह़े एखाद्या विद्याथ्र्याला मुळात ईएनटीसी शाखेत शिकण्याची व यातच आपले भवितव्य घडविण्याची इच्छा असेल परंतु       सोबत इतर विद्यार्थी नसल्याने सक्तीच्या विद्याशाखा बदलामुळे  त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यावरही उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आह़ेशासकीय अभियांत्रिकीसाठी विद्याथ्र्याना मोठय़ा परिश्रमानंतर प्रवेश मिळत असतो़ इतर खाजगी महाविद्यालयात घेण्यात येणारी भलीमोठी प्रवेश फी, डोनेशन, वर्षभर घेण्यात येत असलेली प्रॅक्टीकल फी आदींमुळे तेथे शिक्षण घेत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो़ त्यामुळे राज्यात ेकोठेही प्रवेश मिळत असल्यास विद्याथ्र्याची जाण्याची तयारी असतेच़ परंतु अशा प्रकारे कमी विद्यार्थी संख्येचा परिणाम इतर विद्याथ्र्यावर पडत असल्यास याबाबत शासनाने मार्ग काढण्याची अपेक्षा आता विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े