शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

विसरवाडीतील आगीत गोडावूनसह सहा घरे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : आॅईल रिपॅकींगच्या गोडावूनला लागलेल्या आगीत गोडावूनसह शेजारील सहा घरे जळून खाक झाली. या घटनेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : आॅईल रिपॅकींगच्या गोडावूनला लागलेल्या आगीत गोडावूनसह शेजारील सहा घरे जळून खाक झाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. शॉर्ट सक्रीटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आॅईल जळाल्याने त्यातून निघणारा काळा धूर पाच ते सहा किलोमिटर अंतरावरून दिसत होता. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हाणी झाली नाही. याबाबत विसरवाडी पोलिसात रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.विसरवाडी येथील ग्रामपंचायत गल्लीत दिनेश प्रकाश जयस्वाल यांचे बालाजी इंटरप्रायजेस नावाचे वाहनांचे आॅईल रिपॅकींग करण्याचे गोडावून आहे. या ठिकाणी वाहनांचे आॅईल मोठ्या बॅरेलमधून आणून त्याचे एक, दोन, पाच लिटर असे लहान पॅकींग करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. अनेक वर्षापासून मध्यवस्तीत हा व्यवसाय सुरू आहे. गुरुवारी दुपारी अचानक या ठिकाणी आग लागली. गोडावूनमध्ये आॅईलसारखा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आगीच्या लपेट्यात शेजारील सहा घरे देखील आली. त्यात निलेश जयस्वाल यांची दोन घरे, निलेश श्यामलाल जयस्वाल, संदीप श्यामलाल जयस्वाल यांचे प्रत्येकी एक व सेवानिवृत्त शिक्षिका मंजुळाबाई सदाशिव चौधरी यांचे दोन घरे अशी एकुण सहा घरे आगीत खाक झाली. गोडावूनमधील मशिनरी, आॅईलचे ड्रम यासह संसारोपयोगी सामान असा लाखो रुपयांचा ऐवज जळून खाक झाला.घटनेची माहिती मिळताच सरपंच बकाराम गावीत, विसरवाडीचे सहायक निरिक्षक संदीप पाटील, उपनिरिक्षक भूषण बैसाणे व कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले. सरपंच व सहायक निरिक्षक यांनी स्वत: अग्निरोधक यंत्र हातात घेऊन आग विझविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. नंदुरबार, नवापूर, दोंडाईचा येथील अग्निशमन बंब दाखल झाले होते. परंतु तोपर्यंत गोडावून आणि सहा घरे खाक झाली होती. चार तासानंतर आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. धुराचे लोट सहा किलोमिटर अंतरावरून दिसून येत होते. त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले होते.सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, नवापूरचे तहसीलदार सुनिता जºहाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, तलाठी नरेंद्र महाले, मंडळ अधिकारी जयंत वसावे उपस्थित होते. रात्री उशीरापर्यंत विसरवाडी पोलिसात आगीची नोंद करण्याचे काम सुरू होते.४आगीत सर्व संसार बेचिराख होत असल्याचे पाहून महिलांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.४गुरुवारी विसरवाडीत बाजाराचा दिवस असतो. त्यामुळे ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. आगीची घटना कळल्यानंतर ते पहाण्यासाठी एकच गर्दी झाली होती. आग विझविण्यासोबत गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली.४ग्रामस्थ तसेच गावातील युवकांनी देखील आपल्या परीने मिळेल त्या साधनांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. काहींनी आॅईलचे ड्रम बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.