शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

चिनी वस्तू वापरावर नागरिकांकडून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : चीनच्या सूडबुद्धीला आव्हान देण्याच्या निमित्ताने बऱ्याच नागरिकांकडून चिनी वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यानिमित्ताने ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : चीनच्या सूडबुद्धीला आव्हान देण्याच्या निमित्ताने बऱ्याच नागरिकांकडून चिनी वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यानिमित्ताने कानुबाई, दशामाता गणेशोत्सवासाठी बाजारात विक्रीस आलेल्या चिनी वस्तूंच्या मागणीत सुमारे १५ टक्क्यांनी मागणी घटल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.सण-उत्सव म्हटला की नागरिकांकडून आकर्षक आरास, देखावा तयार करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी विशेषत: चिनी वस्तूंचा अधिक वापर करण्यात येतो. या वेळी सजावटीसाठी लागणारे कमल फूल, झाड, मेटल बल्ब, लहान-मोठी लायटींग, स्पॉटलाईट, एलईडी स्ट्रीप, लेझर लाईट, नारळ, एलईडी पार लाईट, ड्रॉप लाईट अशा विविध प्रकारच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपासून चीनकडून देण्यात येत असलेल्या धमक्यांमुळे देशवासीयांनी चिनी वस्तूंच्या वापरावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा चिनी वस्तूंच्या विक्री व वापरावर परिणाम झाला आहे.राख्यांमध्ये ‘मेड इन इंडिया’चाबोलबालायावर्षी कोरोनामुळे राखी बाजारावर परिणाम झाला आहे. दरवर्षी एक महिन्यापूर्वीच राख्यांची बाजारपेठ सजत होती. पण यावर्षी पाच ते सहा दिवसापूर्वी ग्रामीण भागातील बाजारात राख्यांची दुकाने पहायला मिळाली. चिनी राख्यांच्या किमतीच्या तुलनेत यावर्षी भारतीय राख्या २० टक्के महाग झाल्या. १५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत किंमत होती. प्रत्येक राखीची कलाकुसर आकर्षक असल्याने प्रत्येकाचे मन मोहून घेतले. मुलांसाठी कार्टून कॅरेक्टरच्या अनेक राख्या उपलब्ध होत्या. त्यात डोरेमॅन, छोटा भीम आणि लायटिंगच्या राख्यांचा समावेश होता.बाजारात जुन्या चिनी राख्यांची विक्रीशहादा शहरातील व्यापारी म्हणाले की, ज्या व्यापाऱ्यांकडे गेल्यावर्षीच्या जुन्या चिनी राख्यांचा साठा आहे , ते त्या राख्यांची विक्री करीत आहेत. यंदा चिनी राख्या कोणत्याही ठोक व्यापाºयांनी मागविल्या नाहीत. बाजारातही भारतीय बनावटीच्या राख्यांना मागणी होती. सध्या २५ टक्केही व्यवसाय झालेला नाही. जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या भीतीने व्यापारी संभ्रमात आहेत.काही नागरिकांकडूनचिनी वस्तू खरेदीसध्या कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये सण-उत्सवाला सुरुवात झाली आहे. काही नागरिक आर्थिक बाजू कुमकुवत जरी झाली आहे तरी सण-उत्सव साजरे करण्यावर भर देत आहेत. सजावटीसाठी लागणारे चिनी वस्तू स्वस्त दरात मिळत असल्याने चिनी वस्तू खरेदीकडे गोरगरीब जनतेचा काही प्रमाणात कल लागला आहे.