प्रसंगी तळोदा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, श्रीकृष्ण गौशाळेचे अध्यक्ष आनंदा मराठे, माजी भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, खलील पिंजारी, ऋषी चौधरी, रांझणीचे विठोबा महाले, धनराज भंवर, अभिमन्यू मराठे, चिनोद्याचे जयेश पटेल आदी उपस्थित होते.
प्रारंभी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन गौमातेचे पूजन करण्यात आले. रांझणी गौशाळेचे अध्यक्ष आनंदा मराठे यांनी गौशाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी सांगितले की, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रांझणी येथील गौमातेच्या सेवेबरोबरच वृक्षारोपण, व्यसनमुक्ती यासारखे सामाजिक उपक्रम राबवून संस्कृती रक्षणाबरोबर समाजहित जोपासणाऱ्या रांझणी येथील श्रीकृष्ण गौशाळेचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे निमित्ताने यापुढेही असेच विविध सामाजिक कार्य त्यांनी करत आदर्श कायम ठेवावा.
कोविड नियमांचे पालन करुन हा उपक्रम पार पडला.