या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या संकटातून सामान्य माणूस अद्आपही सावरलेला नाही. सर्वसामान्य लोकांची जगण्याची प्रचंड धडपळ सुरू आहे. त्यातच अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली असताना सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावणाऱ्या केंद्र सरकारच्या नाकर्तेवृत्तीमुळे महागाई गगनाला भिडली आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकार अपयशी ठरली आहे.
देशात महागाईने कहर केला असून, पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. शेती व्यवसायसुद्धा मोडकळीस आला आहे. यामुळे सर्वसामान्य जनता संकटात सापडली आहे. देशाला देशोधडीला लावण्याऱ्या या भाजप सरकारचा आम्ही निषेध करतो.
जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून त्यांचे जे अच्छे दिन होते तेदेखील या भाजपा सरकारने हिरावून घेतले आहे. झोपेचे सोंग करणाऱ्या या भाजप सरकारने आता तरी झोपेचे सोंग बंद करून जनतेचे जे अगोदरचे अच्छे दिन होते ते परत आणून द्यावे. अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारण्यात येईल, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
या निवेदनावर तळोदा शहर शिवसेना प्रमुख जितेंद्र दुबे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रुपसिंग पाडवी, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश कुलकर्णी, युवासेना शहरप्रमुख जगदीश चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक संजय पटेल, शहर संघटक विनोद वंजारी, माजी उपनगराध्यक्ष गौतमचंद जैन, तालुका संघटक प्रमुख आकाश पाडवी, उपतालुका प्रमुख दिलवर पाडवी, काशिनाथ कोळी, युवासेना उपशहर प्रमुख श्रावण तिजवीज, शिवसेना उपशहर प्रमुख दीपक मोरे, महेंद्र गुरव, सागर वाणी, विजय मराठे, नितू सोनार, नितीन ठाकरे, गणेश चित्रकथे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.