शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

Vidhan Sabha 2019: भाजपच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची अस्तित्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 11:51 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भाजपची बंडखोरी, शिवसेनेची अस्तित्वाची लढाई आणि काँग्रेसचा प्रतिष्ठेचा मुद्दा अशा वर्चस्वाच्या ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भाजपची बंडखोरी, शिवसेनेची अस्तित्वाची लढाई आणि काँग्रेसचा प्रतिष्ठेचा मुद्दा अशा वर्चस्वाच्या ट्रँगलमध्ये अक्कलकुवा मतदारसंघाची लढत अडकली आहे. मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या लढाईत काँग्रेस उमेदवार अॅड.के.सी.पाडवी आठव्यांदा विजयी होतात की शिवसेनेचे आमशा पाडवी यांचे नशीब उजाडते याकडे लक्ष लागून आहे.  राज्यातील पहिला मतदारसंघ म्हणून अक्कलकुवा मतदारसंघाला ओळखले जाते. या पहिल्याच मतदारसंघातून विजयाची सुरुवात व्हावी यासाठी शिवसेनेने अस्तित्वाची लढाई लढण्यास सुरुवात केली आहे तर काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी बंडखोरी करीत येथे शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या बंडखोरीचा फटका काँग्रेसलाही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघातून अर्थात पूर्वीच्या धडगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी.पाडवी हे अपक्ष, जनता दल आणि काँग्रेस यांच्याकडून सतत सात वेळा निवडून आले आहेत. 2009 पासून पुनर्रचनेत हा मतदारसंघ अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांचा होऊन अक्कलकुवा म्हणून ओळखला जावू लागला. नवीन मतदारसंघातही के.सी.पाडवी निवडून येत आहे. यंदा आठव्यांदा ते निवडणूक लढवीत आहेत. युतीअंतर्गत शिवसेनेच्याच वाटय़ाला असलेला हा मतदारसंघ यंदा अपेक्षेप्रमाणे शिवसेनेला सुटला आहे. गेल्या वेळी शिवसेनेकडून लढलेले पक्षाचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी हेच यावेळीही उमेदवारी करीत   आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची धडगाव येथे जाहीर सभा देखील झाली. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमशा पाडवी यांना रघुवंशी यांची चांगली मदत मिळू लागली आहे. पूर्वीचे राष्ट्रवादीचे विजयसिंग पराडके, किरसिंग वसावे यांचीही साथ मिळत आहे. दुसरे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे हे देखील मेहनत घेत आहेत. युतीअंतर्गत सर्व आलबेल असतांना या ठिकाणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे सहाजिकच या ठिकाणी सरळ होणारी लढत आता तिरंगी होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. नागेश पाडवी यांनी गेल्या पाच वर्षापासून मतदारसंघात संपर्क सुरू ठेवला होता. शिवसेनेने शहाद्यात प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बंडखोरीबाबत तक्रार झाल्याने नागेश पाडवी यांच्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले  आहेत. 

काँग्रेसच्या प्रचाराचे मुद्दे

जास्तीत जास्त गाव, पाडय़ांर्पयत रस्ते करून दळणवळणाची सोय उपलब्ध करून दिल्याचा दावा.दुर्गम भागातील गाव, पाडय़ांर्पयत वीज पोहचविली. 71 वन गावांचा प्रश्न सोडविल्याने ही गावे आता महसूली झाल्याने मुख्य प्रवाहात आल्याचा मुद्दा.अनेक ठिकाणी आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना पक्की इमारत बांधून देत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.अक्कलकुवा शहर आणि धडगाव शहर विकासासाठी वेळोवेळी निधी आणून दिल्याचा दावा.

शिवसेना युतीच्या प्रचाराचे मुद्दे 

वर्षानुवर्षे अनेक गावे, पाडे रस्ते, पाणी, विजेच्या सोयींपासून दूर.आंबा, सिताफळ, महू या पासून प्रक्रिया उद्योगाच्या वेळोवेळी घोषणा परंतु काहीही हालचाल नाही.पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्याला कारण दळणवळणाच्या अपु:या सोयी-सुविधा.नर्मदा काठावरील अनेक गावांना सुविधांचा अभाव. डूब क्षेत्रातील गावे व परिवार आजही वा:यावरच.मतदारसंघात नियमित संपर्काचा अभाव.

लढतीतील सहा उमेदवार व त्यांचे पक्ष अॅड.के.सी.पाडवी (काँग्रेस), आमशा फुलजी पाडवी (शिवसेना), नागेश दिलवरसिंग पाडवी (अपक्ष), कैलास वसावे (आम आदमी पार्टी), संजय वळवी (भारतीय ट्रायबल पार्टी), करमसिंग वळवी (अपक्ष)