शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खरवड शिवारात बिबटय़ाच्या हल्ल्यात मेंढय़ा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 13:05 IST

शेतकरी चिंतेत : खरवड शिवारातील घटना

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 5 : तळोदा तालुक्यातील खरवड शिवारात बिबटय़ाने दुपारच्या वेळी दोन मेंढय़ांवर हल्ला चढवत त्यांना ठार केल़े सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ अनेकांनी बिबटय़ाला पाहिल्याचे सांगितले असून बिबटय़ाचा संचार सुरू झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत़ ऐचाळे ता़ साक्री येथील मेंढपाळ कुटूंब गेल्या काही दिवसांपासून खरवड गावालगत मुक्कामास आह़े सोमवारी दुपारी मेंढपाळ दगा ठेलारी मेंढय़ांना पाणी देण्यासाठी खरवड गावाजवळील राजेंद्र गोसावी यांच्या ऊसाच्या शेतात घेऊन गेले होत़े मेंढय़ा पाणी पित असताना अचानक शेतात दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने दोन मेंढय़ांवर वार करत त्यांना ठार केल़े अचानक झालेल्या या हल्ल्याने मेंढपाळ दगा ठेलारी यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली़ यावेळी परिसरात असलेले पंचायत समिती सदस्य नंदूगीर गोसावी, संजय गोसावी, मोहनगीर गोसावी यांनी धाव घेतली़ परंतू तोवर बिबटय़ा दोघा मेंढय़ांना ओढून शेतात घेऊन गेला होता़ यावेळी खरवड गावातील काहींनी लाठय़ाकाठय़ा घेऊन ऊसात शोध घेण्याचा प्रयत्न केला़ यात एका मेंढीचे धूड त्यांच्या हाती लागल़े भरदुपारी बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यामुळे खरवड, मोड आणि बोरद परिसर हादरून गेला आह़े या भागात ब:याच दिवसांपासून वन्यप्राणी दिसून येत नसल्याने शेतकरी चिंतामुक्त होत़े आता पुन्हा वन्यप्राण्यांचा संचार सुरू झाल्याने चिंता वाढल्या आहेत़ या घटनेनंतर मेंढपाळ दगा ठेलारी यांच्यासह ग्रामस्थांनी बोरद व तळोदा येथील वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना माहिती दिली होती़ मात्र सायंकाळपर्यत अधिका:यांनी याठिकाणी भेट दिली नसल्याचे सांगण्यात आले आह़े तळोदा तालुक्यात गेल्या काही वर्षात बिबटय़ाचा संचार वाढीस लागला आह़े ऊस आणि केळीच्या शेतात मुक्काम करणा:या बिबटय़ांमुळे मजूर कामावर येत नसल्याचे प्रकार घडतात़ चार ते पाच वर्षापूर्वी बिबटय़ाच्या हल्ल्यात आमलाड येथे पशुपालक बालक ठार झाल्याची घटना घडली होती़ यानंतर सातत्याने तळोदा तालुक्याच्या विविध भागात बिबटय़ाच्या हल्ल्यात पाळीव जनावरे ठार झाले आहेत़   तळोदा बिबटय़ाचा संचार थांबवण्यासाठी वनविभागाने ठोस कारवाई करण्याची अपेक्षा शेतक:यांची असून येत्या काळात पुन्हा बिबटय़ाचा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े