शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महू फुलापासून तयार केलेल्या ३२ व्यंजनांची चवच न्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:25 IST

संडे अँकर । सातपुड्यातील चोंदवाडे येथे भरला महूवा महोत्सव, २०० महिलांचा सहभाग

नंदुरबार : सातपुड्यात कल्पवृक्ष महू महोत्सवाचे यंदाही आयोजन करण्यात आले होते़ चोंदवाडे बुद्रुक येथे झालेल्या महोत्सवात २६ गावातील महिलांनी सहभाग घेतली होती़ यावेळी महिलांनी महू फुलांपासून तयार केलेल्या विविध व्यंजनाची चव चाखण्यासाठी पर्यटकांनी भेट दिली होती़ या पदार्थांची पर्यटकांनी मनमुराद तारीफ करत त्यांची माहिती घेतली़राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, बायफ मित्र संस्थेच्या महाराष्ट्र जीन प्रकल्प यांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला़ यात चोंदवाडे बुद्रुक, चोंदवाडे खुर्द, खरवड, आंबारी, बिलबारा, बोरवण, वडफळ्या, रोषमाळ बुद्रुक, कात्री, माकडकुंड, मनखेडी, बिजरी, उमराणी, छापरी, शेलकुवी, कुवरखेत, दरा, चिंचोरा, भोगवाडे आदी २६ गावातील २०० महिला उपक्रमात सहभागी झाल्या होत्या़ यावेळी महोत्सवाचे प्रवर्तक नाना पावरा, दिलीप वसावे, नमु पावरा, लिलेश चव्हाण, प्रा़डॉ़ एच़एम़पाटील, प्रा़ हरीभाऊ पवार, राजेश देवकर, राकेश पावरा, कविता वळवी, सविता पावरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ २६ गावातील महिलांनी ३२ प्रकारचे खाद्यपदार्थ यावेळी तयार करुन आणले होते़ यात महू भाजी, महू शरबत, लाडू, हिते, चरणी, भाजलेले महू, राबडी, महू फुलांचे बोंडे, चिचोडे, चकल्या, मोवणी, डुकल्या, महू लस्सी, पोळ्या, पुरी, बुंदी, गुलाब जामून, पेठे, खीर, सांजोऱ्या, ऊसळ, बडा चांन्त्या आदी व्यंजने तयार करुन आणली होती़दरम्यान महूपासून तयार करण्यात येणाºया काही पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली़ सविता पावरा, ज्योती पावरा, सुनंदा पावरा, कविता वळवी या महिलांनी खाद्यपदार्थांचे गुणधर्म विषद केले़ महूचे आरोग्यवर्धक गुणधर्म याविषयावरही येथे चर्चा करण्यात आली़