शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील निवृत्त सैनिकाच्या घरात भर दिवसा चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:03 IST

लोकमत ऑनलाईनशहादा, दि़ 1 : हरिओम नगरातील निवृत्त सैनिकाच्या घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरटय़ांनी भरदिवसा चोरीचा धाडसी प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यातील मुबारकपूर येथील रहिवाशी तथा निवृत्त सैनिक शरद भगतसिंग अहेर हे दोंडाईचा रस्त्यावरील हरिओम नगरात राहतात. सोमवारी दुपारी चार वाजेच्या ...

लोकमत ऑनलाईनशहादा, दि़ 1 : हरिओम नगरातील निवृत्त सैनिकाच्या घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरटय़ांनी भरदिवसा चोरीचा धाडसी प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यातील मुबारकपूर येथील रहिवाशी तथा निवृत्त सैनिक शरद भगतसिंग अहेर हे दोंडाईचा रस्त्यावरील हरिओम नगरात राहतात. सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी मुलांना क्लासेसला सोडण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. या काळातच अज्ञात चोरटय़ांनी भर दिवसा घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील तीन लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला. मात्र चोरटय़ांना किंमती ऐवज वा मोठी रक्कम हाती लागू शकली नाही. थोडय़ावेळाने घरी परत आलेल्या शरद अहेर यांच्या पत्नीस घराचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. त्यांनी शेजारी व नातेवाईकांना ही माहिती दिली.भर दिवसा अज्ञात चोरटय़ांनी घरफोडी केल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.चोरटय़ांचा शोध लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.