शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहादा उपविभाग : वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : वीज वितरण कंपनीच्या शहादा ग्रामीण उपविभाग दोनअंतर्गत  येणा:या ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांचे सुमारे 30 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. या उपविभागात येणा:या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : वीज वितरण कंपनीच्या शहादा ग्रामीण उपविभाग दोनअंतर्गत  येणा:या ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांचे सुमारे 30 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. या उपविभागात येणा:या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागाच्या भाग दोनमध्ये 108 ग्रामपंचायती ग्राहक आहेत. यात काही मोठय़ा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यापैकी ब्राrाणपुरी कक्षमधील गणोर, सुलतानपूर, बहिरपूर, कोचरा, ब्राrाणपुरी, खेडदिगर, पाडळदा कक्षामधील अलखेड, औरंगपूर, पाडळदा, कुढावद, चिखली, चिखली पुनर्वसन, बुडीगव्हाण, म्हसावद कक्षामध्ये फत्तेपूर, वीरपूर, मडकाणी, अमोदा, जुनवणे, पिंप्री, इस्लामपूर, लक्कडकोट, तलावडी व मंदाणे कक्षातील कमरावद, कोळपांढरी, नवीन असलोद, गोवळीपाडा, भुलाणे, घोडलेपाडा, मलगाव, सोनवल, चिखली, सावखेडा, चांदसैली या ग्रामपंचायतींकडे 30 कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी आहे. बिलांच्या वसुलीसाठी वीज कंपनीने धडक मोहीम सुरू करून गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पथदिवेही बंद असल्यामुळे गावागावात अंधाराचे साम्राज्य आहे.वीज कंपनीने थकीत बिले भरण्याबाबत संबंधितांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींनी याची दखल घेतली नाही म्हणून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने त्या त्या गावातील ग्रामस्थांना जंगलात जाऊन पाणी मिळवावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील मोठय़ा लोकसंख्येच्या गावांमधील पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत न करण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतल्याचे समजते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून जोर्पयत थकबाकीची रक्कम भरली यात नाही तोपावेतो त्या त्या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागतील, असे चित्र दिसते. मोठय़ा गावांमधील पथदिवे बंद असल्याने चोरीच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे याबाबत तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.