शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बॅनरविरोधात शहादा पालिका कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 13:00 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 30 : बॅनर, पोस्टर, होर्डीग, ङोंडे लावण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने दिला आहे.प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, डॉ.उल्हास देवरे, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी या वेळी प्रशासनाची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 30 : बॅनर, पोस्टर, होर्डीग, ङोंडे लावण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने दिला आहे.प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, डॉ.उल्हास देवरे, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी या वेळी प्रशासनाची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची 1 मेपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे साताळकर यांनी सांगितले.  1 मे 2018 पासून ङोंडे, बॅनर, होर्डीग लावण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक असून विनापरवानगी होर्डीग, बॅनर लावल्यास कारवाई केली जाईल. तसेच पालिकेची परवानगी घेण्यापूर्वी ज्या जागेवर पोस्टर लावायचे असेल त्या जागा मालकाचा नाहरकत दाखला घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी बॅनर लावावेत व कार्यक्रमानंतर ते लगेच काढून घ्यावे अन्यथा पोलीस व पालिका प्रशासन ते काढून घेईल व संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक शुक्ल यांनी सांगितले. या वेळी जि.प. सदस्य अभिजित पाटील, अरविंद कुवर, अशोक बागूल, बापू जगदेव, ईश्वर पाटील, के.डी. पाटील, लोटन धोबी, सुनील गायकवाड, मनलेश जायसवाल, यशवंत चौधरी,  जितेंद्र जमदाळे, रमाशंकर माळी आदी उपस्थित होते.