शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहादा-मुंबई शयनयान बस पूर्ववत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:40 IST

शहादा : शहादा-मुंबई ही शयनयान रातराणी सेवा पूर्ववत वेळापत्रकानुसार सुरू करावी, अशी मागणी विश्वासू प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. ...

शहादा : शहादा-मुंबई ही शयनयान रातराणी सेवा पूर्ववत वेळापत्रकानुसार सुरू करावी, अशी मागणी विश्वासू प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. ही सेवा पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा ईशाराही देण्यात आला आहे.यासंदर्भात विश्वासू प्रवासी संघटनेने धुळे विभागीय कार्यालयाचे विभाग नियंत्रकांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. शहादा आगारातून गेल्या २० वषार्पासून सायंकाळी सात वाजता शहादा-मुंबई ही बस सुरू आहे. त्यानंतर याच वेळेत शयनयान ही नवी सेवा मंडळाने सुरु केली. शयनयान सेवेची भाडे आकारणी कमी केल्याने या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता शहादा-मुंबई ही बस सेवा रात्री ९-३० वाजता खेड दिगर येथून सुरु करण्यात आली आहे. ही बस शहादा येथून रात्री सव्वा दहा वाजता मुंबईसाठी मार्गस्थ होत असल्याने तसेच या बस सेवेला धुळे नंतर थेट भिवंडी येथे थांबा असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आहे. ही बस सेवा शहादा येथूनच पूर्ववत रात्री साडेआठ वाजता मुंबईसाठी सुरू करण्यात यावी. तसेच या बसला धुळे नंतर नाशिक व ठाणे असे दोन थांबे देण्यात यावे, अशी मागणी विश्वासू प्रवासी संघटनेने विभाग नियंत्रक धुळे विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात शहादा-पुणे शयनयान रातराणी सेवेला शिर्डी येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. शहादा आगाराची सकाळी पावणे नऊ वाजता सुटणारी अहमदाबाद व दुपारी साडेबारा वाजता सुटणारी सुरत या शंभर टक्के पेक्षा अधिक भारमान व उत्पन्न देणाऱ्या गाड्या असून, या दोन्ही गाड्या प्रतिष्ठेचा विषय म्हणून दोंडाईचा आगारास वर्ग करण्याचा घाट घातला जात आहे. अहमदाबाद व सुरत या दोन्ही गाड्या दोंडाईचा आगारास वर्ग करण्यात येऊ नये, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. दोंडाईचा येथून सुरत व अहमदाबादसाठी रेल्वेसेवा असल्याने शहादा आगारातून सुटणाऱ्या या दोन्ही बसेस वर्ग करू नये अन्यथा संघटनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रा.दत्ता वाघ, उपाध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी व सचिव रवींद्र पंड्या यांनी दिला आहे.