शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
3
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
4
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
5
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
6
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
7
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
8
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
9
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
10
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
11
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
12
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
13
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
14
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
15
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
16
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
17
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
18
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
19
न बोलता कृतीतून शिकवणाऱ्या ‘जीजीं’ची पाखर
20
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!

शहादा चालक प्रशिक्षण केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खान्देशातील पहिले चालक प्रशिक्षण केंद्र शहादा आगारात सुरु करण्यात येणार आह़े परंतु सर्व सोयी-सुविधांची व्यवस्था होऊनही केवळ उद्घाटनाअभावी  हे केंद्र सुरु होण्यास प्रतीक्षा करावी लागत आह़े सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटनाला विलंब होतोय़एसटी महामंडळाकडून एसटी म्हणजे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खान्देशातील पहिले चालक प्रशिक्षण केंद्र शहादा आगारात सुरु करण्यात येणार आह़े परंतु सर्व सोयी-सुविधांची व्यवस्था होऊनही केवळ उद्घाटनाअभावी  हे केंद्र सुरु होण्यास प्रतीक्षा करावी लागत आह़े सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटनाला विलंब होतोय़एसटी महामंडळाकडून एसटी म्हणजे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील युवकांसाठी चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आलेले आह़े राज्यात यवतमाळ येथे हे केंद्र सुरु झाले असून त्यानंतर दुसरे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा:या नंदुरबारातील शहादा तालुक्यात हे चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचे नियोजन होत़े त्यासाठी शहादा बस आगाराच्या इमारतीत या केंद्राची उभारणी करण्यात आलेली आह़े या केंद्रात अनुसूचित जमातीच्या  युवकांना चालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आह़े त्याच प्रमाणे त्यांच्यासाठी येथे निवासाची सोयसुध्दा उपलब्ध होणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आलेली आह़े राज्यभरातील युवकांना आधारअनुसूचित जमातीतील युवकांना कौशल्य विकासाची संधी मिळावी, त्यांना रोजगाराचे साधन मिळावे यासाठी एसटी महामंडळाकडून चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची योजना आखली गेली़ यासाठी राज्यातील आदिवासी बहुसंख्य असलेले जिल्हे निवडण्यात आले आहेत़ यात, यवतमाळ व नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आह़े राज्यभरातील अनुसूचित जमातीमधील युवक या चालक प्रशिक्षण केंद्रात निवासी पध्दतीने प्रवेश घेऊन चालकाचे प्रशिक्षण घेऊ शकतात़ त्यामुळे राज्यभरातील युवकांना या चालक प्रशिक्षण केंद्रांचा आधार वाटत आह़े त्यामुळे लवकरात           लवकर याचे उद्घाटन करुन चालक प्रशिक्षण केंद्र सुरु कण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत आह़ेकेंद्र कायमस्वरुपी कार्यान्वितचालक प्रशिक्षण केंद्र हे प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आह़े परंतु हे केंद्र कायमस्वरुपी कार्यान्वित रहावे अशी मागणी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीमधील युवकांकडून करण्यात येत आह़े विनामुल्य हे केंद्र चालविण्यात येणार असल्याने याचा मोठय़ा प्रमाणावर फायदा आदिवासी युवकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े हे चालक प्रशिक्षण केंद्र निवासी असल्याने साहजिकच जिल्ह्यासह राज्यभरातील युवकांची या ठिकाणी सोय होणार आह़े शहादा बस आगारातील या केंद्रात सर्व सोयी-सुविधांची पूर्तता झालेली आह़े 15 ऑगस्ट पूर्वीचा होता मुहूर्त15 ऑगस्टपूर्वी हे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले होत़े त्यानुसार त्याचे कामही पूर्ण झालेले आहेत़ परंतु मंत्री दिवाकर रावते यांची तारीख मिळत नसल्याने या केंद्राचे भिजत घोंगडे कायम असल्याची माहिती आह़े परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाकडून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आह़े तारीख मिळाल्यास लगोलग या केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम आवरण्यात येणार आह़े यासाठी धुळे एसटी विभागाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आह़ेचालक प्रशिक्षण केंद्र सुरु व्हावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीही उदासिन दिसून येत आह़े लोकप्रतिनिधींनी याबाबत पुढाकार घेतल्यास सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आह़े