शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

शहादा व नवापुरला होणार नवीन पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी आणि दोन राज्याच्या सिमेवरील वाढती दारू, गुटखा, वाळू तस्करी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी आणि दोन राज्याच्या सिमेवरील वाढती दारू, गुटखा, वाळू तस्करी पहाता जिल्ह्यात पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्यासाठी पोलीस दलाकडून चाचपणी केली जात होती. अखेर दोन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यात शहादा शहर आणि नवापूर शहरासाठी ही नवीन पोलीस ठाणी राहणार आहेत. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात उपनगर पोलीस ठाण्याची भर पडली होती.जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. नंदुरबार, शहादा, नवापूर या भागात एमआयडीसी विकसीत होत असल्याने नवीन उद्योग येण्यासाठी उत्सूक आहेत. रेल्वेमार्ग, चार राष्टÑीय आणि चार राज्य मार्ग, दोन राज्यांच्या सिमा यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांवर मोठा ताण पडत असतो. सण, उत्सव, सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात तर पोलिसांची परिक्षाच राहते. बाहेरून अतिरिक्त बंदोबस्त मागवावा लागतो. ही बाब लक्षात घेता पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करावी अशी मागणी गेल्य अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्याची आता दखल घेण्यात आली असून प्रस्ताव रवाना झाले आहेत.शहादा पोलीस ठाणेशहादा पोलीस ठाण्यावर मोठा भार आहे. ७० हजार लोकसंख्येचे शहादा शहर आणि तालुक्यातील दहा मोठी गावे आणि ५० पेक्षा अधीक गावे या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतात. शहादा शहरात गेल्या काही वर्षात वेळोवेळी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली होती.संवेदनेशील शहर म्हणून देखील ओळख निर्माण होऊ पहात आहे. त्यामुळे पोलीस दलाचा जास्त वेळ आणि शक्ती ही शहराच्या कायदा व सुव्यवस्थेतच जास्त जात जाते. त्यामुळे ग्रामिण भागाकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेता शहरासाठी वेगळे पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत सर्व्हे करण्यात आला. लोकसंख्या, विस्तार आणि गुन्हेगारीचे प्रमाण याची आकडेवारी नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी पुरक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहादा शहरासाठीच्या नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव तयार करून तो पाठविण्यात आला आहे.नवापूरही प्रस्तावीतनवापूर शहराची हद्द ही गुजरातला लागून आहे. महामार्गा देखील येथून गेला आहे. शहराची लोकसंख्या ४० हजारापेक्षा अधीक झाली आहे. शहराचा विस्तार वाढत आहे. नवीन एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग येत आहेत. त्यात परप्रांतीय कामगारांची संख्या वाढत आहे. नवापुरात देखीेल गेल्या काही वर्षात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. येथील पोलीस ठाण्यावर नवापूर शहर आणि अर्धा नवापूर तालुक्याचा भार आहे. त्यामुळे पोलिसांची मोठी कसरत होते. ही बाब लक्षात घेता नवापूर शहर आणि परिसरातील काही खेड्यांसाठी नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.नवीन पोलीस ठाण्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व बाबी येथे पुरक आहेत. त्यामुळे या पोलीस ठाण्याचा प्रस्ताव देखील गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे.४नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत तीन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये आहेत. त्यात नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा यांचा समावेश आहे.४जिल्ह्यात १२ पोलीस ठाणे आहेत. याशिवाय एक शहर वाहतूक शाखा आहे.४नंदुरबार उपविभागात नंदुरबार शहर, उपनगर व तालुका, विसरवाडी व नवापूर ही पोलीस ठाणी. शहादा उपविभागात शहादा, म्हसावद, सारंगखेडा, धडगाव तर अक्कलकुवा उपविभागात अक्कलकुवा, मोलगी व तळोदा ही पोलीस ठाणी आहेत.